Download App

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी पदकांची लयलूट; नेमबाजीत 5 पदके, टेनिसमध्ये रौप्य

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा 2023 मध्ये (Asian Games 2023) भारतासाठी सहावा महत्त्वाचा होता. भारताने नेमबाजीत (Shooting) 5 पदके जिंकली. याशिवाय किरण बालियानने टेनिसमध्ये (Tennis) रौप्यपदक आणि महिलांच्या शॉटपुट प्रकारात कांस्यपदक पटकावले. तर स्क्वॉशच्या (Squash) महिला सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 33 वर पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

आज पुन्हा नेमबाजीमध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी दिसून आली. पहिल्या 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत, भारताच्या ईशा सिंग, पलक आणि दिव्या या त्रिकुटाने 1731-50x गुणांसह रौप्य पदक जिंकले. यानंतर नेमबाजीतील दुसरे पदक गोल्डच्या रूपात आले. यात ऐश्वर्या प्रताप सिंग, स्वप्नील आणि अखिल या त्रिकुटाने 50 मीटर रायफल 3 पोझिशन पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत जिंकले.

महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात नेमबाजीत भारताला दिवसातील तिसरे आणि चौथे पदक मिळाले. या स्पर्धेत पलकने 242.1 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. ईशा सिंगने 239.1 गुण मिळवत रौप्यपदक जिंकले. यानंतर नेमबाजीत दिवसाचे पाचवे पदक ऐश्वर्या प्रताप सिंगने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन पुरुषांमध्ये 460.6 गुण मिळवून रौप्य पदक पटकावले.

मुंबईच्या स्वच्छतेवरून Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा; भाजप म्हणते जरा लाज वाटू…

टेनिसच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या साकेथ मायनेनी आणि राजकुमार रामनाथन या जोडीला चायनीज तैपेईच्या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. स्क्वॉशच्या महिला सांघिक स्पर्धेत भारतीय संघाला हाँगकाँगविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

‘दिवाळीनंतर देशात कत्तल की रात’; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने लक्ष वेधलं…

भारताच्या किरण बालियानने 17.36 मीटर फेक करून शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील ट्रॅक अँड फिल्डमधील भारताचे हे पहिले पदक आहे.

Tags

follow us