Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने बांग्लादेशचा 12-0 असा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी हॅट्ट्रिक गोल केले. भारतीय संघाने गटातील पाचही सामने जिंकले.
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकीपटूंची दमदार कामगिरी कायम आहे. भारतीय खेळाडूंनी पाच ग्रुप सामन्यांमध्ये 58 गोल केले आहेत. तर भारताविरुद्धच्या 5 सामन्यांत विरोधी संघ केवळ 5 गोल करू शकला. आता भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. 3 ऑक्टोबरला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. टीम इंडियाचा उपांत्य फेरीत चीनशी सामना होऊ शकतो.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 24 तासात तब्बल 24 बालकांचा मृत्यू
भारत-बांग्लादेश सामन्यात सुरुवातीपासूनच टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा दिसून आला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसऱ्याच मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमण सुरूच ठेवले. भारताने तिसऱ्याच मिनिटाला दुसरा गोल केला. मनदीप सिंगने भारतासाठी तिसरा गोल केला. ललित उपाध्यायने 23व्या मिनिटाला चौथा गोल केला. अवघ्या 1 मिनिटानंतर म्हणजेच 24व्या मिनिटाला मनदीपने पाचवा गोल केला. भारताचा सहावा गोल 28व्या मिनिटाला झाला. अशा प्रकारे भारताने सामन्यात 6-0 अशी आघाडी घेतली.
Bihar Caste Survey Results : जातीनिहाय जनगणना अन् कास्ट; बिहार सर्व्हेची संपूर्ण ABCD
कर्णधार हरमनप्रीत सिंगने 32 व्या मिनिटाला भारतासाठी सातवा गोल केला. तर अभिषेकने 41व्या मिनिटाला आठवा गोल केला. मनदीपने पुन्हा एकदा 46व्या मिनिटाला गोल केला. 47व्या मिनिटाला नीलकांत शर्माने रिबाऊंडवर गोल केला. सुमितने 56व्या मिनिटाला अप्रतिम गोल केला. यानंतर 57व्या मिनिटाला अभिषेकने भारतासाठी 12वा गोल केला.