AUS vs PAK : कांगारूंचा पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरचा सामना जिंकत मालिकाही खिशात

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त खेळ करत (AUS vs PAK) पाकिस्तानचा पराभव केला. कसोटी मालिकेतील तिन्ही कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानसाठी मात्र नव्या वर्षाची सुरुवातच अत्यंत निराशाजनक राहिली. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत करत तीन कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0 अशा फरकाने […]

AUS vs PAK : कांगारूंचा पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरचा सामना जिंकत मालिकाही खिशात

AUS vs PAK : कांगारूंचा पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरचा सामना जिंकत मालिकाही खिशात

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त खेळ करत (AUS vs PAK) पाकिस्तानचा पराभव केला. कसोटी मालिकेतील तिन्ही कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानसाठी मात्र नव्या वर्षाची सुरुवातच अत्यंत निराशाजनक राहिली. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत करत तीन कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0 अशा फरकाने जिंकली. तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला 130 धावांचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. डेविड वॉर्नरने 57 तर मार्नस लाबूशेनने 62 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

Aus VS Pak : कांगारूंनीही पाकला धुतलं; 62 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानी झेप

सिडनीत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 313 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 299 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 60 धावा केल्या. पहिल्या डावात पाकिस्तानला फक्त 14 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात मात्र पाकिस्तानला फार काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कशाबशा 115 धावा करता आल्या. हेजलवूडने 4 आणि नॅथन लियॉनने 3 विकेट्स घेत पाकिस्तानला जोरदार धक्के दिले.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी फक्त 130 धावाच करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठत पाकिस्तानचा पराभव केला. डेविड वॉर्नरने 57 तर मार्नस लाबूशेनने 62 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानसाठी हा पराभव धक्कादायक होता. कारण पहिल्या दोन कसोटी सामन्यातही संघाचा पराभव झाला होता. तशीही ऑस्ट्रेलियाने मालिका आधीच जिंकली होती. त्यामुळे निदान अखेरचा सामना जिंकून थोडीतरी सन्मानजनक स्थितीत राहू अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. परंतु, पाकिस्तानी संघाला ते ही जमलं नाही.

Steve Waugh : ..तर मी क्रिकेटच खेळलो नसतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘त्या’ निर्णयावर स्टीव्ह वॉ भडकला

 

Exit mobile version