Steve Waugh : ..तर मी क्रिकेटच खेळलो नसतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘त्या’ निर्णयावर स्टीव्ह वॉ भडकला

Steve Waugh : ..तर मी क्रिकेटच खेळलो नसतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘त्या’ निर्णयावर स्टीव्ह वॉ भडकला

Steve Waugh : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय (IND vs SA Test) संघाचा पराभव झाला. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला दुसरा सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी केली असून यावेळी संघात काही बदल होतील असे सांगण्यात येत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार आहे. हा सामना जिंकून कमबॅक करण्याचे भारतीय संघाचे (Team India) उद्दीष्ट असेल. मात्र हे सगळं सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) मात्र चांगलाच संतापला आहे. त्याच्या संतापाचं कारण ठरला आहे दक्षिण आफ्रिका क्रिकेट (South Africa) बोर्डाचा निर्णय.

कसोटी मालिका सुरू असताना आफ्रिकेने न्यूझीलँड दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी अगदीच नवखा संघ निवडण्यात आला आहे. 14 पैकी 7 खेळाडू तर असे आहेत की ज्यांनी कधी कोणतीही कसोटी मॅच खेळलेली नाही. विशेष म्हणजे संघाचा कर्णधारच असा निवडण्यात आला आहे की जो स्वतःच या मालिकेतून पदार्पण करणार आहे. या निर्णयावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला आहे.

दक्षिण आफ्रिकेला कोणतीच काळजी दिसत नाही असं मला वाटतंय. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड आपलं भविष्य दाखवत आहे. अव्वल दर्जाच्या खेळाडूंना घरी बसवून नव्या मुलांना पाठवत आहे. मी जर न्यूझीलँडच्या संघात असतो तर क्रिकेटच खेळलो नसतो,असं स्टीव्ह वॉ म्हणाला.

IND vs SA : दुसऱ्या कसोटीसाठी गावस्कर-पठाण यांनी निवडली प्लेइंग इलेव्हन, हे केलंत बदल

पाकिस्तानही आपली बेस्ट टीम घेऊन ऑस्ट्रेलियात आलेला नाही. यातून हेच दिसत आहे की या टीम्स कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत नाहीत. वेस्ट इंडिजनेही मागील दोन वर्षांपासून आपली बेस्ट टीम निवडलेली नाही. आयसीसीने याकडे लक्ष दिलं पाहिजे, अशा शब्दांत वॉने नाराजी व्यक्त केली.

पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यावेळी अष्टपैलू खेळाडू रवींद जडेजाला (Ravindra Jadeja) संधी मिळाली नव्हती. सामना सुरू होण्याआधीच तो दुखापतग्रस्त झाला होता. आता मात्र तो फिट झाला असून दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसेल. या सामन्यात भारतीय संघात काय बदल होणार आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची निवड निश्चित झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज