T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 साठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात पॅट कमिन्ससह स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला देखील पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर संघात जोश हेझलवूड, टिम डेव्हिड यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मिचेल ओवेन आणि बेन द्वारशियस यांना संघात स्थान देण्यात आलेला नाही. 7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 साठी ऑस्ट्रेलियाचा नेतृत्व मिचेल मार्श करणार आहे.
डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज कूपर कॉनॉलीने बीबीएल 2025 (BBL 2025) मध्ये जबरदस्त फॉमात असून आतापर्यंत त्याने या स्पर्धेत 166.66 च्या स्ट्राईक रेटने 170 धावा केल्या आणि 7.62 च्या इकॉनॉमी रेटने पाच विकेट्स घेतले आहे. टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) मध्ये तो अॅडम झांपा, मॅट कुहनेमन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासोबत संघाला आणखी एक फिरकी पर्याय उपलब्ध करून देईल.
तर दुसरीकडे कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्सचा (Pat Cummins) देखील संघात समावेश करण्यात आला आहे मात्र तो अद्याप पूर्णपणे फिट नाही. जानेवारीच्या अखेरीस त्याच्या पाठीच्या स्कॅनवरून तो टी20 विश्वचषकात खेळेल की नाही हे ठरवता येईल, कारण त्याने अॅशेस मालिकेत फक्त एकच सामना खेळला होता. हॅमस्ट्रिंग आणि अॅकिलीसच्या दुखापतीमुळे संपूर्ण अॅशेसला मुकलेला जोश हेझलवूड, तसेच हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बीबीएलला मुकलेला फिनिशर टिम डेव्हिड यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
8th Pay Commission आजपासून लागू; पगारात होणार बंपर वाढ, जाणून घ्या किती वाढणार?
2026 च्या टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ
मिशेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅट कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झांपा
