U19 World Cup 2024 : अंडर-19 विश्वचषकाच्या (U19 World Cup) सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशचा (Ind vs Ban) 84 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ केवळ 167 धावा करू शकला. या सामन्यादरम्यान बांग्लादेशी खेळाडूंची टीम इंडियाच्या खेळाडूंशी झटापट झाली. बांग्लादेशी खेळाडूने भारतीय खेळाडूंशीही गैरवर्तन केले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, प्रकरण वाढत असल्याचे पाहून पंच आले आणि त्यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना शांत केले.
नाणेफेक गमवल्यावर प्रथम फलंदाजीला आल्यावर टीम इंडियाच्या पहिल्या दोन विकेट झटपट पडल्या. अर्शीन कुलकर्णी 7 धावा करून तर मुशीर खान 3 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारन आणि आदर्श सिंह यांनी डावाची धुरा सांभाळली. यादरम्यान बांग्लादेशचा खेळाडू अरिफुल इस्लामने भारतीय खेळाडूंशी वाद घातला. 25व्या षटकात उदयने एक शॉट मारला होता. यानंतर अरिफुलला राग आला. त्याने टीम इंडियाचा कर्णधार उदयला शिवीगाळ केली. ते पाहून उदयही थांबला नाही त्याने उत्तर दिले. यानंतर प्रकरण वाढत गेले आणि पंचांच्या मध्यस्थीतीने वाद मिटला.
मॉस्कोला जाणारे भारतीय विमान दुर्घटनाग्रस्त : अफगाणिस्तानच्या डोंगरात कोसळल्याचे वृत्त
यानंतरही बांग्लादेशच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंवर अपशब्द वापरले. 44 व्या षटकात मारूफ मृधा बांग्लादेशकडून गोलंदाजी करत होता. अरावेली अविनाश टीम इंडियाकडून फलंदाजी करत होता. त्याने षटकार मारला. मात्र यानंतरच तो बाद झाला.
Manoj Jarange : ‘दादागिरी करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा’; जरांगेंचा सरकारला इशारा
— Cricket Videos (@cricketvid123) January 20, 2024
मारूफने अविनाशकडे काही हातवारे केले. अविनाशने त्याला पाहिलं पण काहीच बोलला नाही. पण मृधा थांबली नाही, त्याचे भारतीय खेळाडूंना डिवचणे सुरुच राहिले. दरम्यान अंपायरला मध्यस्थी करावी लागली.
— Sitaraman (@Sitaraman112971) January 20, 2024