IND vs PAK : विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) पराभव केला होता. दोन्ही संघ आमनेसामने आले की तो सामना नेहमीच हायहोल्टेज असाच असतो. आताही भारत पाकिस्तान पुन्हा कधी भिडणार याची चाहते वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही उत्सुकता कमी करणारी बातमी आली आहे. आता परत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. ज्युनियर अंडर-19 आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक (Under 19 Asia Cup) जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत 10 डिसेंबर रोजी भारत (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सामना होणार आहे.
अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार (25 नोव्हेंबर) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने 15 सदस्यांची यादी जाहीर केली. UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर सौम्य कुमार पांडे उपकर्णधार असणार आहे.
Asia Cup 2023 : श्रीलंकेला धूळ चारत आशिया चषकावर भारताने कोरलं नाव..
आशिया चषक 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 8 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर 10 डिसेंबरला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. भारतीय संघ 12 डिसेंबरला नेपाळशी भिडणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 डिसेंबर रोजी दुबई येथे खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत खरे आकर्षण कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याचेच राहणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करण्याचा पराक्रम टीम इंडियाने केलाच आहे. आता 19 वर्षांखालील संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
19 वर्षांखालील विश्वचषक 2024 साठी आशिया चषक महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी अंडर-19 विश्वचषक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये भारत उपविजेता ठरला आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; नाशिक अन् बीडचे शिलेदार करणार देशाचे प्रतिनिधित्व
आशिया कपसाठी भारताचा अंडर-19 संघ: अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार) ), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.