Asia Cup 2023 : श्रीलंकेला धूळ चारत आशिया चषकावर भारताने कोरलं नाव…

Asia Cup 2023 : श्रीलंकेला धूळ चारत आशिया चषकावर भारताने कोरलं नाव…

Asia Cup 2023 : भारताने आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली असून अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. भारताने चषकावर आठव्यांदा नाव कोरलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला असून चषकावर नाव कोरताच भारतीय संघाकडून जल्लोष करण्यात येत आहे.

Dhangar Reservation : चौंडीत आंतरवलीची पुनरावृत्ती; धनगर आंदोलकाची प्रकृती खालवताच लावले सलाईन

आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होताच श्रीलंकेच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक गळती लागल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या 50 धावांमध्ये श्रीलंकेचा सर्वच्या सर्व संघ तंबूत परतला आहे. मोहम्मद सिराजने सहा तर हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या आहेत.

Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं?; बच्चू कडूंनी गुवाहाटीतला ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला

आशिया कपचा शेवटचा सामना आज खेळवला गेला आहे. भारत आणि श्रीलंकेचे संघ अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. विजेतेपदासाठी श्रीलंकेने भारतासमोर 50 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताची पहिलीच जोडी ईशांत किशन आणि शुभमन गिल यांनी शानदार खेळी करीत 50 धावांचा पाठलाग करीत सामना जिंकला आहे.

Asia Cup 2023 : भारताचा विक्रमच! अवघ्या 37 बॉलमध्येच विजय खेचून आणला…

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने 6 विकेट घेतल्या आणि हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेची संपूर्ण टीम 50 धावांमध्येच तंबूत पाठवली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांवर बाद झाला. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची आजची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये भारतीय टीमने श्रीलंकन टीमला 22 षटकांमध्ये 73 रणांमध्येच गुंडाळले होते.

अंतिम सामन्यावर भारताची पकड इतकी मजबूत होती की, श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अशातच भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने सामन्यात आपली धमक दाखवत एकाच षटकात 4 फलंदाजांना माघारी पाठवत एक विक्रमच रचला आहे. मोहम्मदची एकदिवसीय सामन्यामधील ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

दुसऱ्या इनिंगमध्ये भारतासमोर श्रीलंकेने 50 षटकांत 50 धावांचं आव्हान दिलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचे सलामीचे फलंदाज इशान किशन आणि शुभमन गिल यांनी अवघ्या 37 बॉलमध्ये श्रीलंकेचं आव्हान गाठत दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये शुभम गिलने 19 बॉलमध्ये 27 धावा तर इशान किशनने 18 बॉलमध्ये 23 धावा करुन विजय खेचला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube