BCCI Give Extension To Rahul Dravid As A Head Coach Of Team India : वर्ल्ड कप 2023 मधील पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बदलणार की नाही या प्रश्नाचे उत्तर अखेर बीसीसीआयने दिले आहे. एक मोठी घोषणा करत बुधवारी (दि. 29) बीसीसीआयने राहुल द्रविडला (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. वर्ल्ड कप फायनलनंतर राहुल द्रविडचा करार संपुष्टात आला होता. त्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, सर्व चर्चांना बीसीसीआयकडून (BCCI) अखेर पूर्णविराम देण्यात आला असून, पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडला नेमण्यात आले आहे. द्रविडसह बीसीसीआयने फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा करारदेखील वाढवला आहे.
BCCI announces the extension of contracts of head coach Rahul Dravid along with support staff pic.twitter.com/ZcGacTkPkQ
— ANI (@ANI) November 29, 2023
पुन्हा द्रविडचं का?
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडचीच निवड का करण्यात आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी खुलासा केला आहे. जय शाह म्हणाले की, टीम इंडियाचा प्रशिक्षक असतानाचा द्रविडचा कार्यकाळ उत्तम आणि आश्चर्यकारक राहिला आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा त्याची निवड करण्यात आली आहे. द्रविड किमान टी-20 विश्वचषकापर्यंत टीम इंडियासोबत असणार आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे.
Glenn Maxwell : ‘मॅक्सवेल’च्या तुफानी खेळीचा ‘हिटमॅन’ला फटका; मोठं रेकॉर्ड संकटात
नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे. यामध्ये राहुल द्रविडचा मोठा वाटा होता. या कामगिरीमुळेच राहुल द्रविड पुन्हा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. टीम इंडियाच्या यशस्वी वाटचालीसाठी खेळाडू आणि द्रविडला सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास बिन्नी यांनी दिला आहे.
सलग दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियच्या टीमवर सर्जिकल स्ट्राईक : तब्बल 6 खेळाडू परत बोलावले
विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर राहुल द्रविडने पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाल्याने आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीसीसीआयने नेहमीच माझ्या योजना आणि दूरदृष्टीला पाठिंबा दिला आहे, आपल्यावर पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल बीसीसीआयचे द्रविडने आभार मानले आहेत. विश्वचषकानंतर एख प्रशिक्षक म्हणून नवीन आव्हाने उभी असून, या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असल्याचे द्रविड म्हणाला आहे.