BCCI On Gautam Gambhir : कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाची कामगिरी खराब असल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला हटवण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. तर आता बीसीआय देखील कसोटी क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी गौतम गंभीरकडून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय संघाला लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये नवीन प्रशिक्षक मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या माहितीनुसार, बीसीसीआयने (BCCI) कसोटी क्रिकेटसाठी नवीन प्रशिक्षकाचा शोधही सुरू केला आहे. भारतीय संघाने गंभीरच्या (Gautam Gambhir) प्रशिक्षणाखाली वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशचा पराभव केला आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध 0-3 (INDvsNZ) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 (INDvsSA) असा पराभव भारतीय संघाला पत्करावा लागला आहे. तर दुसरीकडे व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये गंभीरचा प्रशिक्षक म्हणून रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकून दिले आहे.
लक्ष्मण होणार प्रशिक्षक
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बीसीसीआयच्या एका प्रमुख सदस्याने व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधून भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक होण्याची ऑफर दिली आहे. मात्र व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) सध्या बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (NCA) येथे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याने त्याने कसोटीमध्ये भारताचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात, मालगाडीचे 3 डबे पुलावरुन नदीत कोसळले तर अनेक डबे रुळावरून घसरले
गौतम गंभीरचा बीसीसीआयसोबतचा करार 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अखेरीपर्यंत चालेल, परंतु पाच आठवड्यांनी सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकात भारताच्या कामगिरीच्या आधारे त्यावर पुनर्विचार होण्याची दाट शक्यता आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये गौतम गंभीरकडे मुख्य प्रशिक्षक म्हणुन जबाबदारी देण्यात यावी की नाही याबाबत बीसीसीआयमध्ये चर्चा सुरु असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
