BCCI Meeting : आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या पराभवानंतर बीसीसीआय आता अॅक्शन मोडवर असून भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह मुख्य निवडर्ता अजित आगरकर आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्ही.व्ही. एस लक्ष्मणला बैठकीसाठी गुरुवार 3 सप्टेंबर रोजी मुंबईतील मुख्यालयात बोलवण्यात आले आहे. या बैठकीत श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमधील भारताच्या पराभवांचाही आढावा घेतला जाणार आहे. जूनमध्ये आयर्लंडमध्ये झालेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला. या पराभवामुळे टी20 विश्वचषक विजेत्या भारताची सलग 16 मालिकांमधील (सुमारे तीन वर्षांची) विजयी मालिका खंडित झाली होती. तर इंग्लंड दौऱ्यावर पाचपैकी चार सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. तर एकदिवसीय मालिकेत भारताचा 1-2 ने पराभव झाला होता.
तर आता भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर देखील जाणार असल्याने तसेच पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक असल्याने खेळाडूंच्या दुखापती आणि त्यांची तंदुरुस्ती हे या बैठकीतील चर्चेचे मुख्य मुद्दे असतील.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघ जाहीर करण्याच्या संदर्भात, चार खेळाडूंचा सहभाग त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांची 9 सप्टेंबर रोजी फिटनेस चाचणी होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्याचा विचार करता, वेगवान गोलंदाजांना दुखापतींपासून वाचवण्यासाठी आणि भविष्यात खेळाडूंच्या दुखापतींचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवरही बीसीसीआय चर्चा करेल.
मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द; कारण काय?-
या बैठकीत हार्दिक पांड्याची तंदुरुस्ती आणि त्याच्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेबाबतही चर्चा केली जाईल. बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीची (पुरुष) अशी इच्छा आहे की हार्दिक पांड्या 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी उपलब्ध असावा. मात्र, सध्याची स्थिती पाहता, तो एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच किंवा सहा षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही.
