ध्रुव जुरेलची नंबर ‘सातव’वर खणखणीत शतकीय खेळी; हार्दिक पांड्याच्या विक्रमाशी बरोबरी

Dhruv Jurel: सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने 9 बाद 503 धावांवर डाव घोषित केला. त्यावेळी जुरेल 115 धावांवर नाबाद होता.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Dhruv Jurel

Sri Lanka vs India 2026 2st Test : कोलंबोतील एसएससी मैदानावर श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (Sri Lanka vs India 2026 2st Test) सामन्यात भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel ) एक इतिहास रचला आहे. त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकावले. श्रीलंकेमध्ये सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत कसोटी शतक करणारा जुरेल हा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय.
(Dhruv Jurel scores century at No. 7, joins Hardik Pandya in record)

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने 9 बाद 503 धावांवर डाव घोषित केला. त्यावेळी जुरेल 115 धावांवर नाबाद होता. त्याने 171 चेंडूंचा सामना करत 9 चौकार लगावले. 99 धावांवर पोहोचल्यानंतर शतकासाठी त्याने तब्बल 13 चेंडू निर्धाव खेळून काढले. त्यानंतर असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत त्याने शतक झळकविले. यानंतर फर्नांडोच्या गोलंदाजीवर आणखी एक षटकार लगावत भारताला 500 धावांचा टप्पा पार करून दिला. जुरेलसोबत प्रसिद्ध कृष्णा 4 धावांवर नाबाद होता. हे जुरेलचे कसोटी क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. या शतकासह जुरेलने हार्दिक पांड्याच्या विक्रमाची बरोबरी केली. श्रीलंकेमध्ये सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत कसोटी शतक करणारे आता केवळ जुरेल आणि हार्दिक पांड्या हे दोन भारतीय आहेत. पांड्याने 2017 मध्ये पल्लेकेले येथे 108 धावांची खेळी केली होती.

कोणत्याही देशात सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत कसोटी शतक करणारा अखेरचा भारतीय फलंदाज नितीश कुमार रेड्डी होता. त्याने डिसेंबर 2024 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 114 धावा केल्या होत्या. जुरेलने या डावात ऋषभ पंतसोबत सातव्या विकेटसाठी 112 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पंतने 89 चेंडूंमध्ये 63 धावा केल्या. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच तो बाद झाला. त्यानंतर जुरेलने मानव सुथारसोबत 39 धावांची भागीदारी केली. सुथारने 18 धावा केल्या. त्याला प्रभात जयसूर्याने बाद केले.

शुभम गिलचे संयमी अर्धशतक
यानंतर जुरेलने मोहम्मद सिराजसोबत डाव पुढे नेला. भारताने 8 बाद 475 धावांवरून 9 बाद 503 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर डाव घोषित केला. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ 5 बाद 300 धावांवरून सुरू केला होता. देवदत्त पडिक्कलने 117 धावांची शानदार खेळी केली, तर कर्णधार शुभमन गिलने संयमी अर्धशतक झळकावले. या दोघांच्या खेळीमुळे भारताने पहिल्या दिवशी 2 बाद 66 धावांवरून दमदार पुनरागमन केले.

श्रीलंकेचे सलामीवीर झटपट बाद

श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने 106 धावांत 4 विकेट घेतल्या. प्रभात जयसूर्या आणि केशरा नुवान्थाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताच्या 503 धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. लाहिरू उदानाला केवळ एका धावेवर यशस्वी जैस्वालने तिसऱ्या स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर मानव सुथारने प्रभातला 2 धावांवर पायचीत केले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 2 बाद 8 धावा अशी झाली.दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या 2 बाद 8 अशी होती. पदार्पण करणारा कामिल मिशारा 5 धावांवर नाबाद होता. श्रीलंका तब्बल 495 धावांनी पिछाडीवर आहे.

follow us