मनोज तिवारीची क्रिकेटमधून निवृत्ती, एका गोष्टीचं व्यक्त केलं दुःख

Manoj Tiwary Retirement : बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने Manoj Tiwary रणजी करंडक क्रिकेटमधून (Ranji Trophy Cricket)नुकतीच निवृत्ती घेतली आहे. मनोज तिवारीने शेवटचा रणजी सामना बिहारविरुद्ध (Bihar)खेळला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला अखेरचा राम-राम केला. विशेष म्हणजे मनोज तिवारी आपला शेवटचा सामना ईडन गार्डनमध्ये(Eden Gardens Stadium) खेळला आणि त्याला त्याच्या होम ग्राऊंडवर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळायला […]

Manoj Tiwary Retirement

Manoj Tiwary Retirement

Manoj Tiwary Retirement : बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने Manoj Tiwary रणजी करंडक क्रिकेटमधून (Ranji Trophy Cricket)नुकतीच निवृत्ती घेतली आहे. मनोज तिवारीने शेवटचा रणजी सामना बिहारविरुद्ध (Bihar)खेळला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला अखेरचा राम-राम केला. विशेष म्हणजे मनोज तिवारी आपला शेवटचा सामना ईडन गार्डनमध्ये(Eden Gardens Stadium) खेळला आणि त्याला त्याच्या होम ग्राऊंडवर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळायला मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. त्याचवेळी मनोज तिवारीने एका गोष्टीचं दुःख व्यक्त केलं आहे.

बाळासाहेब थोरातही भाजपच्या वाटेवरच; रिअल फॅक्टस् सांगत सुजय विखेंचा दावा

मनोज तिवारीने यापूर्वीही निवृत्त घेतली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, काही दिवसांनंतर त्याने आपला निर्णय मागे घेत आणखी एक वर्ष रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात त्याने बंगालच्या टीमचे नेतृत्व केले आणि त्याच्या शेवटच्या सामन्यात बिहारविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला.

Chatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे क्षणचित्रे

मनोज तिवारी निवृत्तीबद्दल सांगताना एका गोष्टीबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्याने सांगितले की, माझ्या आवडत्या मैदानावर मी निवृत्ती घेत आहे याचा मला खूप आनंद आहे. पण बंगालसाठी रणजी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, याचा पश्चाताप आहे.

मनोज तिवारीने, टीम इंडियासाठी अनेक सामने खेळले होते. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 12 सामने खेळले. त्यात त्याने 287 धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. त्याने तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 15 धावा केल्या होत्या.

मनोज सध्या बंगालचा क्रीडा राज्यमंत्री आहे. त्याने 2004 मध्ये ईडनमधून प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली. त्याने आपला पहिला रणजी सामना दिल्लीविरुद्ध खेळला. मनोजच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 45 अर्धशतके आहेत. त्याने 148 सामन्यात 10,195 धावा केल्या आहेत.

Exit mobile version