ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा यंदा पाकिस्तानात (Champions Trophy) होत आहेत. येत्या 19 फेब्रुवारीपासून या टू्र्नामेंटला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील सहभागी क्रिकेट संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. परंतु, काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे स्पर्धा सुरू होण्याआधीच संघ अडचणीत सापडले आहेत. आताची बातमी बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाशी (South Africa) संबंधित आहे. या संघातील आघाडीचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामने होणार आहेत. आता या सामन्यात कोएत्झी दिसणार नाही.
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार; उपचारांसाठी BCCI न्यूझीलंडला पाठवण्याच्या तयारीत
येत्या 8 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात त्रिसदस्यीय मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी दक्षिण आफ्रिकेला जोरदार झटका बसला आहे. गेराल्ड कोएत्झी दुखापतीमुळे या मालिकेत खेळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याचीही शक्यता जवळपास नाही अशी स्थिती आहे.
दक्षिण आफ्रिकेची सुरुवात 10 फेब्रुवारीपासून होणार आहे. न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी आफ्रिकेने 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मात्र हा संघ जाहीर झाल्यानंतर काही तासांतच पहिला झटका बसला. एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीतून दुखापतीमुळे तो बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत माहिती दिली आहे. गोलंदाजी करत असताना गेराल्डला कंबरेत त्रास जाणवला त्यामुळे त्याला बाहेर बसावे लागणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून (ICC Champions Trophy 2025) बाहेर पडणारा गेराल्ड हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी एनरिक नॉर्खिया यालाही दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.या त्रिपक्षीय मालिकेसाठी टेम्बा बावुमा (कर्णधार), ईथन बॉश, मॅथ्यू ब्रिट्जके, ज्यूनियर डाला, वियान मूल्डर, मिहलाली मपोंगवाना, सेनुरन मुथुसामी, गिदोन पिटर्स, मीका ईल प्रिंस, जेसन स्मिथ आणि काइल वेरिन यांचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश आहे.
तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका संघात टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्जी, मार्को यान्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, वियान मूल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रियान रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि रॅसी वॅन डुसेन यांचा समावेश आहे.
रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जाणार? BCCI चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत