T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. मात्र आता या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत (T20 World Cup Schedule) एक मोठा अपडेट समोर आला आहे. माहितीनुसार, आयसीसीने (ICC) या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी (Second Semi-Final) कोणताही राखीव दिवस (Reserve day) ठेवलेला नाही. आयसीसीने या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला आहे यामुळे हा सामना त्याच दिवशी पूर्ण होणार आहे.
आयसीसीच्या या निर्णयामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकते. कारण अंतिम 4 मध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघ दुसरी सेमीफायनल खेळणार आहे.
T20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य फेरीचा सामना 27 जून रोजी गयानामध्ये खेळवला जाणार आहे. जर हा सामना राखीव दिवसामध्ये खेळवला गेला तर दुसरा उपांत्य आणि अंतिम सामन्यात 24 तासांपेक्षा कमी अंतर राहिला असता त्यामुळे आता हा सामना 27 जूनलाच संपवण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. माहितीनुसार, संघाला सलग दिवस प्रवास करावा लागू नये यासाठी या सामन्यासाठी अतिरिक्त चार तास देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.
तर T20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी रात्री 8.30 वाजता त्रिनिदाद येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला असून जर या सामन्यात पाऊस आला तर हा सामना 27 जून रोजी खेळवला जाईल.
दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी गयानामध्ये खेळण्याची परिस्थिती वेगळी असल्याने हा सामना त्याच दिवशी पूर्ण करावा लागणार आहे. हा सामना 27 जून रोजी सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने अतिरिक्त 250 मिनिटे दिली आहेत.
4 जूननंतर शेअर बाजारात येणार तेजी! अमित शहांचं मोठं भाकीत, जाणून घ्या विश्लेषकांचं मत
यामुळे मॅच अधिकारीकडे हा सामना संपण्यासाठी आठ तासांचा वेळ आहे. तर 28 जून रोजी अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या दोन्ही संघाचा प्रवासाचा दिवस असेल आणि T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.