भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय; कुस्ती संघटनेचे ‘ते’ सर्वच पदाधिकारी अपात्र

WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतरमंतर (Jantar Mantar)कुस्तीपटूंचं धरणे आंदोलन सुरु आहे. त्याचा आज 21 वा दिवस आहे. त्यातच भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (IOA) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आयओएचे सहसचिव कल्याण चौबे (Kalyan Chaubey)यांनी कुस्ती संघटनेला आदेश जारी करुन सर्व पदाधिकाऱ्यांच्या […]

Jantar Mantar

Jantar Mantar

WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतरमंतर (Jantar Mantar)कुस्तीपटूंचं धरणे आंदोलन सुरु आहे. त्याचा आज 21 वा दिवस आहे. त्यातच भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (IOA) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आयओएचे सहसचिव कल्याण चौबे (Kalyan Chaubey)यांनी कुस्ती संघटनेला आदेश जारी करुन सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय, आर्थिक कामांवर बंदी घातली आहे.

कर्नाटकात राष्ट्रवादीचं काय ? पवार म्हणाले, एखाद्या राज्यात एन्ट्री घ्यायची असेल तर..

आयओएने कुस्ती असोसिएशनला खाती आणि परदेशी टूर्नामेंट, वेबसाईट ऑपरेशन्ससाठी प्रवेशासाठी लॉगिन त्वरित सूपूर्द करण्यास सांगितले आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका रद्द करुन आयओएच्या तदर्थ समितीकडे निवडणुकांचे आयोजन करण्याचे काम सोपवल्यानंतर आयओएने हे पाऊल उचलले आहे.

आयओएने 3 मे रोजी कुस्ती संघटना चालवण्यासाठी आणि 45 दिवसांच्या आत समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात वुशू फेडरेशनचे भूपेंद्र सिंग बाजवा, ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरुर आणि निवृत्त न्यायाधीश यांचा समावेश होता.

समितीनेही आपले काम सुरु आहे. त्यांनी आपल्या नेतृत्वाखालील 17 वर्षाखालील आणि 23 वर्षांखालील आशियाई चॅम्पियनशीप संघासाठी निवडचाचणी आणि निवड समितीची घोषणा केली. मात्र आयओने कुस्ती संघटनेवर स्थिगिती आदेश काढला नाही. त्यामुळे कुस्ती संघटनेचे सरचिटणीस व्ही.एन. प्रसूद हे कुस्ती संघाचे काम सुरु ठेवताना इमेल व इतर साधनांचा वापर करत होते.

Exit mobile version