Download App

पद्मश्री, ऑलिम्पियन कौर सिंग यांचे निधन

Boxer Kaur Singh: पद्मश्री ऑलिम्पियन बॉक्सर कौर सिंग (Kaur Singh) यांचे निधन झाले आहे. आज वयाच्या 74 व्या वर्षी हरियाणाच्या (Hariyana)कुरुक्षेत्र (Kurukshetra)जिल्ह्यातील येथील रुग्णालयात निधन झाले आहे. कौर सिंग हे पंजाबमधील संगरूर येथील खनाल खुर्द गावचे रहिवासी होते. कौर सिंग यांच्यावर आज त्यांच्या गावातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना मधुमेहाचा (diabetes)त्रास होता आणि गेल्या 2 दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती.

मल्लिकार्जुन खर्गेंकडून पंतप्रधान मोदींचा ‘विषारी साप’ असा उल्लेख…

कौर सिंग यांची सातत्यानं तब्येत खालवत होती, त्यामुळे पहिल्यांदा त्यांना पटियाला आणि नंतर कुरुक्षेत्र येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही आशियाई सुवर्णपदक विजेते कौर सिंग यांच्या निधनावर ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. कौर सिंग यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.


1970 मध्ये भारतीय सैन्यात रुजू झाल्यानंतर कौर सिंग यांनी तेथून बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कौर सिंगने पुण्याच्या संस्थेत बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि तेथे सुवर्णपदक जिंकले.

मुंबईमधील 9 व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारे कौर सिंग हे पहिले आणि एकमेव बॉक्सर ठरले. 1982 मध्ये कौर सिंग यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यानंतर 1983 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1984 मध्ये, कौर सिंग यांनी लॉस एंजेलिस, यूएसए येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला आणि त्यानंतरच त्यांनी आपल्या बॉक्सिंग करिअरला राम-राम केला.

कौर सिंग यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारने त्यांचे चरित्र 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे, जेणेकरून तरुण पिढी त्यांच्यापासू प्रेरणा घेऊन खेळात करिअर करू शकेल.

Tags

follow us