मल्लिकार्जुन खर्गेंकडून पंतप्रधान मोदींचा ‘विषारी साप’ असा उल्लेख…

मल्लिकार्जुन खर्गेंकडून पंतप्रधान मोदींचा ‘विषारी साप’ असा उल्लेख…

पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी सापासारखे, तुम्ही चाखाल तर मराल, या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींवर घणाघात केला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी इथं झालेल्या निवडणुक रॅलीत बोलताना मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ असं संबोधलं आहे. कर्नाटकात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलंच वातावरण तापलं असून येत्या 10 मे रोजी मतदान पार पडणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Delhi Excise Case : मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, कोठडीतला मुक्काम वाढला

पुढे बोलताना खर्गे म्हणाले, भ्रष्ट भाजप सरकार राज्याची लूट करत असून प्रत्येक कामासाठी 40% कमिशन आकारले जात आहे. ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत त्यांना भाजप सरकार देशातून पळून जाण्यासाठी मदत करत आहे आणि पंतप्रधान स्वतः भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप पंतप्रधानांसह 50 लाखांपेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. त्यासोबतच काँग्रेस म्हणजे खोटी हमी, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची हमी, असाही आरोप करण्यात येत आहे. त्यावर खर्गेंनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

…ज्या पद्धतीने सरकार पाडले, त्याचा बदला घेणार; उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

काँग्रेसची आश्वासने पूर्ण झाली की नाहीत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही माहिती आहे का? असा मल्लिकार्जून खर्गेंनी केला आहे. त्यावर आता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही ट्विट करीत कर्नाटकातील जनता भाजपचे 40% कमिशन सरकार संपवण्याची हमी देणार असल्याचं ट्विट केलं आहे. तसेच आम्ही राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात केली तशी काँग्रेसची हमी राज्यातही लागू केली जाणार असल्याचंही म्हटलं आहे.

Operation Kaveri : सांगलीतील 100 जण सुदानमध्ये अडकले, सुटकेसाठी कुटुंबीयांची पवारांकडे विनंती

पंतप्रधानांनी निराशेतून हे भाष्य केले आहे. गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्यानंतर आता पंतप्रधान मोदी निराशेमुळे अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर काही तासांनी जयराम रमेश यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

दरम्यान, यावर्षी पंतप्रधान मोदींनी प्रचारापूर्वी आठ वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. 9 एप्रिल रोजी मोदींनी कर्नाटकात भेट दिली होती. त्याआधी, भाजपच्या राज्यव्यापी ‘विजय संकल्प यात्रे’च्या समारोपानिमित्त दावणगेरे इथं रोड शोनंतर मोदींनी जाहीर सभेला संबोधित केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube