Download App

Brijbhushan Sharan Singh यांनी साक्षीचे आरोप फेटाळले; संजय सिंह निकटवर्तीय नसल्याचा दावा

  • Written By: Last Updated:

Brijbhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी कुस्तीपटू साक्षी मलिकने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून नुकतेच पायउतार झालेले संजय सिंह त्यांचे निकटवर्तीय नाहीत.

Sanjay Singh यांची हकालपट्टी केली; कुस्तीपटूंसमोर सरकार झुकलं, पण कारणं वेगळीच..

ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, मी कुस्तीतून 31 डिसेंबर 2022 लाच निवृत्त झालो आहे. निवडणुका न्यायालयाच्या आदेशाने झाल्या आहेत. तसेच साक्षी मलिक म्हटली त्या प्रमाणे संजय सिंह हे माझे निकटवर्तीय नाहीत असं देखील यावेळी शरण सिंह म्हणाले आहेत. त्या दरम्यानच सरकारने देखईल मोठा निर्णय घेतला. नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाची संपूर्ण कार्यकारणी निलंबित करण्यात आले आहे.

काय म्हणाली होती साक्षी मलिक?

बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळील व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने व्यथित झालेली साक्षी मलिकने दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, आम्ही चाळीस दिवस रस्त्यावर आंदोलन केले आहे. देशातील लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला होता. परंतु बृजभूषण शरण सिंह यांच्या व्यावसायिक भागीदार आणि निकटवर्तीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष निवडलं जात आहे. त्यामुळे मी कुस्ती सोडत आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचेही मी आभार मानते. आम्ही पूर्ण ताकदीने लढाई लढलो आहे. तरही अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या मर्जीतील माणूसच अध्यक्षपदी निवडला जात असले तर मी माझा खेळ सोडत आहे.

धनंजय मुंडे कोरोनाच्या विळख्यात; इतर मंत्र्यांनाही धास्ती!

भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. खेळाडूंना यश मिळालं असलं तरी या निर्णयाच्या दुसऱ्या बाजूची देखील तेवढीच सध्या चर्चा सुरू आहे. कारण गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या लढ्याला यश मिळत नव्हतं. मग यावेळी हा निर्णय एवढा तात्काळ का घेतला गेला? सरकारला खेळाडूंचं म्हणणं पटलं की हा सरकारचा नाईलाज आहे. अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण आगामी लोकसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुका डोळ्यासमेर ठेवत हा निर्णय घेतला गेला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज