धनंजय मुंडे कोरोनाच्या विळख्यात; इतर मंत्र्यांनाही धास्ती!

धनंजय मुंडे कोरोनाच्या विळख्यात; इतर मंत्र्यांनाही धास्ती!

Dhananjay Munde : देशासह राज्यात कोरोनाच्या नवा व्हेरिंयट J1 व्हेरियंट (Corona) घोंगावत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातही या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या दिलेल्या असतानाच आता सत्ताधारी सरकारीमधील मंत्र्यांनाच कोरोनाने विळखा घातला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुण्यातील निवासस्थानी विलगीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवस मुंडेंचा पुण्यातील घरी मुक्काम राहणार आहे.

Pune Lok Sabha 2024 : ‘ …तर पुणे लोकसभा निवडणूक लढवणार’; सुनिल देवधरांची घोषणा

हिवाळी अधिवेशनानंतर धनंजय मुंडे यांना काही दिवस खोकल्याचा त्रास सुरु झाला. त्यानंतर काही केल्या खोकला जात नसल्याने धनंजय मुंडे यांनी अखेर कोरोनाची तपासणी केली. कोरोना तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर धनंजय मुंडेंचा पुण्यातील घरीच मुक्काम असून स्वत:ला विलगीकरण केलं आहे. सध्या त्यांच्यावर औषधोपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय.

Mohammed Rafi Birth Anniversary : बैजू बावराचं गाणं अन् रफींच्या घशातून अक्षरशः रक्त येत होतं, वाचा किस्सा

हिवाळी अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून धनंजय मुंडे यांन विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोडपणे प्रत्युत्तर देत असल्याचे पाहायला मिळाले होते. अधिवेशन काळात धनंजय मुंडे यांचा राज्यातील अनेक मंत्र्यांशी संपर्क आला आहे. त्यामुळे आता मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याने इतर मंत्र्यांनाही कोरोनाची धास्ती असेलच, अशी शक्यता आहे. अद्याप मुंडे यांच्याव्यतिरिक्त एकही मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं नाही.

सेंट्रल बॅंक इंडियामध्ये दहावी पास उमदेवारांसाठी नोकरीची संधी, महिन्याला 28 हजाराहून अधिक पगार

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट आला असून या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. तज्ञांच्या मदतीने JN 1 चा अभ्यास केल्यानंतर टास्क फोर्सच मार्गदर्शन करणार आहे. त्यानूसार राज्यात उपाययोजन राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती तानाजी सावंतानी दिली आहे.

Ankita Lokhande: बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेने घेतली पती विकी जैनची बाजू

सध्या एका रुग्णाला नव्या व्हेरियंटची लागण झाली असून त्याचं विलगीकरण करण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना लागण झालीयं का? त्याची तपासणी सुरु करणार आहोत. इतही भागांत तपासणी सुरु असून अद्याप तपासणीत रुग्ण आढळून आलेले नसल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube