Champions Trophy 2025 Aus beat England : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Aus) इंग्लंडचा (England) पाच विकेटसने पराभव केला. या सामन्यात पाचव्या क्रमांकाला फलंदाजीला आलेल्या जोश इंग्लिसचे शानदार शतक झळकवत ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला आहे. तर इंग्लंडच्या बेन डकेटची दीडशतकी खेळी मात्र व्यर्थ गेली.
352 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रेव्हिस हेड सहा धावांवर बाद झाला. परंतु सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने 63 धावा केल्या. तर मार्नस लाबुशनने 47 धावा केल्या. तर जोश इंग्लिसने नाबाद 120 धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरीने अर्धशतक झळकविले. तर ग्लेन मॅक्सवेलने 32 धावांची तुफानी केली केली. त्याने 15 चेंडू खेळत चार चौकार आणि सहा षटकार मारले.
Josh Inglis' thumping 💯 turns it around for Australia as they create history in a run-fest in Lahore 🔥#ChampionsTrophy #AUSvENG ✍️: https://t.co/DBjsJNDgkY pic.twitter.com/lGbeqtTHy2
— ICC (@ICC) February 22, 2025
बेन डकेटने 165 धावांची खेळी
करत इतिहास रचला
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने जबरदस्त फलंदाज करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जेरीस आणले. डकटेने 143 चेंडूत 165 धावांची खेळी केली. त्यात त्याने 17 चौकार आणि तीन षटकार मारले. या जोरावर इंग्लंडने आठ बाद 351 धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजही बेन डकेट ठरला आहे. तर पाकिस्तानच्या खेळपट्टीवर सर्वाधिक धावा करणारा ते चौथा फलंदाजही ठरला आहे. 1996 मध्ये गॅरी कस्टर्नने नाबाद 188, तर विव रिचर्डसने 181, तर पाकच्या फखर जमानने 180 धावा केल्या आहेत. तर जो रुटने 78 चेंडूत 68 धावांची खेळी केली. हे दोघे वगळता इतर फलंदाज खास काही करू शकले नाहीत. तर ऑस्ट्रेलियाच्या बेन द्वारशुईसने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर मार्नस लाबुशेन आणि अॅडम झम्पाने प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या.