Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरूवात 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वी भारतीय संघ पाकिस्तानचा लोगो असणारी जर्सी घालणार नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती मात्र आता यावर बीसीसीआयकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.
या अपडेटनुसार भारतीय संघ जर्सीबाबत या स्पर्धेत आयसीसीच्या नियमांचे पालन करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून अधिकृत लोगोवर आक्षेप नोंदवल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबत माहिती दिली.
माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सर्व अटकळ फेटाळून लावली आहेत. ज्यामध्ये बोर्डाने संघाच्या अधिकृत जर्सीवर यजमान पाकिस्तानचे नाव लिहिण्यास आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी यावेळी कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार की नाही यावर देखील माहिती दिली. उद्घाटन समारंभाला भारतीय कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली.
जर भारतीय संघाने यजमान पाकिस्तानचे नाव असलेला अधिकृत लोगो जर्सीवर घालण्यास नकार दिला तर तो आयसीसीच्या अधिकृत ड्रेस कोडचे उल्लंघन होईल. आयसीसीच्या जर्सी नियमांनुसार, एखादी स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर होत असेल तरीही देखील सहभागी संघांनी त्यांच्या जर्सीवर यजमान देशाचे नाव असलेले लोगो घालणे आवश्यक आहे.
भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध या स्पर्धेत पहिला सामना खेळणार आहे तर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध दुसरा समान आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा शेवटचा लीग सामना खेळणार आहे. भारताचे सर्व सामानाने दुबईमध्ये होणार आहे.