India vs New Zealand: चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy 2025) अखेरचा साखळी सामना रंगतदार झाला. एकवेळ न्यूझीलंडकडे (New Zealand) झुकलेला सामना भारतीय (India) फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आपल्याकडे खेचून आणला. 250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 205 धावांत गारद झाला. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन बाद झाल्यानंतर सामन्यावर भारताने पकड निर्माण केली. केन विल्यमसनने 81 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पर्दापणात वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. भारताने यापूर्वीच सेमीफायनल गाठली आहे. आता भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी सेमीफायनल रंगणार आहे.
Varun Chakravarthy leads the charge with the ball as India register a dominant win to remain unbeaten at the #ChampionsTrophy 🔥#NZvIND ✍️: https://t.co/F2UBD2cv49 pic.twitter.com/dimjQeDAUz
— ICC (@ICC) March 2, 2025
250 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने भक्कमपणे सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पंड्याने रचिन रविंद्रला बाद करत मोठा अडथळा दूर केला. पहिल्या दहा ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 1 बाद 44 धावा केल्या होत्या. तर वरुण चक्रवर्तीने 12 व्या ओव्हरमध्ये विल यंगला बोल्ड केले. 20 ओव्हरअखेर दोन बाद 80 अशी न्यूझीलंडची अवस्था झाली होती. विल्यमसन आणि डारेल मिचेलमध्ये चांगली भागीदारी होत असताना कुलदीपने मिचेलला बाद केले. त्यानंतर टॉम लॅथमला रवींद्र जडेजाने एलबीडब्लू बाद केले. ग्लेन फिलीप्सला वरुणने एलबीडब्लू करत न्यूझीलंडला पाचवा झटका. पाच बाद 151 धावा अशी न्यूझीलंडचा अवस्था झाली होती. त्यानंतर वरुणने मायकेल ब्रेसवेलला बाद करत न्यूझीलंडला सहावा झटका दिला. त्यानंतर केन विल्यमसनला अक्षर पटेलने स्टॅम्प करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मिचेल सँटनरने जोरदार फटकेबाजी सुरू केली. त्यालाही वरुणने बाद केले. मॅट हेन्ररीला बाद करत वरुणने पाचवी विकेट घेतली.
प्रथम फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ 249 धावा करू शकला. भारतीय संघाची सुरुवातीपासून पडझड झाली. श्रेयस अय्यरच्या 79, अक्षर पटेलच्या 42 आणि हार्दिक पंड्याच्या 45 धावांमुळे भारतीय संघ सावरू शकला. न्यूझीलंडच्या मॅट हेन्ररीने पाच विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने नाणेफक जिंकत भारताला फलंदाजीला आमंत्रित केले. परंतु भारतीय संघाची सुरुवात एकदम खराब झाले. सलामीचे तिन्ही फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने 98 धावांची भागिदारी करत डाव सावरला आहे. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा (16 धावा) या जोडीने न्यूझीलंड गोलंदाजांचा सामना केला. सलामीवीर व कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे अपयशी ठरले. शुभनल गिल हा दोन धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा हा 15 धावांवर झाला. 300 वा एकदिवस सामना खेळत असलेला विराट कोहली हा 11 धावांवर तंबूत परतला. कोहलीचा एक शानदार फटका खेळला. परंतु ग्लेन फिलिप्सने हवेत उडी घेत एका हाताने शानदार झेल पकडला.
अय्यर व अक्षर पटेलची 98 धावांची भागिदारी
भारतीय संघाचे तीन फलंदाज अवघ्या 30 धावांवर बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. परंतु श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेट्ससाठी 98 धावांची भागिदारी केली. त्यामुळे संघाची धावसंख्या 128 पर्यंत गेली होती. विलियमस ओरुर्केने अक्षर पटेलने बाद केले. पटेलने 61 चेंडूत 42 धावा केल्या.
श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकविले. त्यानंतर तो 79 धावांवर त्याला ओरुर्केने बाद झाले. अय्यरने 98 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकार मारले. केएल राहुलने 23 आणि रविंद्र जडेजा 16 धावांवर बाद केले. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने 45 चेंडूंत 45 धावांची खेळी केली. त्यात चार चौकार आणि दोन षटकार हार्दिकने मारल्या. मोहम्मद शमीने पाच धावा केल्या.