Download App

Champions Trophy 2025 भारतीय संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी

Champions Trophy 2025 : बीसीसीआयकडून (BCCI) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG)

  • Written By: Last Updated:

Champions Trophy 2025 : बीसीसीआयकडून (BCCI) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) आगामी एकदिवसीय मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा (Team India) केली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने सुरक्षेमुळे पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार नसल्याने भारताचे सामने युएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये दुबई येथे सामना होणार आहे. तर 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध भारत खेळणार आहे. स्पर्धेच्या अ गटात भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह पाकिस्तानचा समावेश आहे तर ब गटात ऑस्ट्रेलियासह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

अजितदादांच्या दोन शिलेदारांची फिल्डिंग अन् भुजबळ थेट शिर्डीत; नाराजी मात्र कायम

तर इंग्लंडविरुद्धच्या आयडीएफसी फर्स्ट बँक एकदिवसीय मालिकेची सुरुवात 6 फेब्रुवारीपासून होणार आहे तर त्यापूर्वी दोन्ही संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

follow us