Download App

मोठी बातमी! उद्या होणार Champions Trophy 2025 साठी भारतीय संघाची घोषणा, कोणाला मिळणार संधी?

Champions Trophy 2025 : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) भारतीय संघात (Team India)

  • Written By: Last Updated:

Champions Trophy 2025 : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) भारतीय संघात (Team India) कोणाला संधी मिळणार आणि कधी भारतीय संघाची घोषणा होणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार याबाबत बीसीसीआयने (BCCI) मोठी अपडेट दिली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या (England) आगामी एकदिवसीय मालिकेसाठी शनिवारी (18 जानेवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12.30 वाजता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) पत्रकार परिषद करून भारतीय संघात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाला संधी मिळाली आहे. याबाबत माहिती देणार आहे. असं बीसीसीआयकडून प्रेस रिलीज जारी करून सांगण्यात आलं आहे.

प्रेस रिलीजमध्ये बीसीसीआयने सांगितले की, पुरुष निवड समिती उद्या इंग्लंडविरुद्धच्या आयडीएफसी फर्स्ट बँक एकदिवसीय मालिकेसाठी आणि आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताचा संघ निवडेल. निवड बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल. अशी माहिती बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये दिली आहे.

19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने सुरक्षेमुळे पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार नसल्याने भारताचे सामने युएईमध्ये (UAE) होणार आहे. या स्पर्धेत 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये (INDvsPAK 2025) दुबई येथे सामना होणार आहे. तर 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध भारत खेळणार आहे. स्पर्धेच्या अ गटात भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह पाकिस्तानचा समावेश आहे तर ब गटात ऑस्ट्रेलियासह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

नाराज भुजबळ देणार अजितदादांना धक्का, भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार?

तर इंग्लंडविरुद्धच्या आयडीएफसी फर्स्ट बँक एकदिवसीय मालिकेची सुरुवात 6 फेब्रुवारीपासून होणार आहे तर त्यापूर्वी दोन्ही संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

follow us