नाराज भुजबळ देणार अजितदादांना धक्का, भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार?

  • Written By: Published:
नाराज भुजबळ देणार अजितदादांना धक्का, भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार?

Chhagan Bhujbal : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर महायुतीमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. या अपडेटनुसार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या जोराने सुरु आहे.

छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भुजबळ लवकर अजितदादांना मोठा धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर 18-19 जानेवारीला शिर्डी (Shirdi) येथे पहिल्यांदा होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनालाही छगन भुजबळ गैरहजर राहणार असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळेच छगन भुजबळ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोराने सुरु आहे.

स्टार प्लसवरील शो “घुम है किसीके प्यार में” मध्ये येणार नवीन ट्विस्ट, भाविका शर्माने केला मोठा खुलासा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना काहीकाळ थांबवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे 18-19 जानेवारीला शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ जाणार नसल्याने सांगण्यात येत आहे. तसेच भाजप छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

रशिया – युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता

follow us
  • fb
  • instagram
  • youtube