Download App

IND vs PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला, फलंदाजी करणार; टीम इंडियालाही सुखद धक्का

या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Champions Trophy 2025 India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायहोल्टेज लढत होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान टीम इंडियालाही एक सुखद धक्का (Team India) बसला आहे. संघातील स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह दुबईत दाखल झाला आहे. दुखापतीमुळे बुमराहने या पूर्ण स्पर्धेतूनच माघार घेतली आहे. तरी देखील तो आज थेट ज्या ठिकाणी भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामना होणार आहे त्या मैदानात दाखल झाला आहे. जसप्रित बुमराहच्या उपस्थितीने पाकिस्तानी खेळाडूंना मात्र गोंधळात टाकलं आहे.

Video : सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा अन् राष्ट्रगीत भारताचं, लाहोरच्या मैदानात पाकिस्तानची पुरती फजिती

उपांत्य फेरीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी भारताला या सामन्यात विजय गरजेचा आहे, तर पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात रोमांच पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने ऋषभ पंत आजारी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. पण त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनला धक्का बसणार नाही. तो उपलब्ध नसल्याने केएल राहुलच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.

ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने होत असल्याने भारताचे सामने दुबईत होत आहेत. त्यामुळे पाकिस्तान संघ सामन्याच्या दोन दिवस आधीच दुबईत पोहोचला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरुवात होईल. त्याआधी दुपारी 2 वाजता नाणेफेक झाली. यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुपारी अडीच वाजल्यापासून पाकिस्तानी संघाच्या फलंदाजीला सुरुवात होईल. आता भारतीय गोलंदाज काय कमाल करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी सट्टा बाजार उसळला; रोहित, कोहली, गिलच्या नावनं करोडोंची उलाढाल 

follow us