आईचं छत्र गमावलं तरी पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेताच वानखेडे गहिवरलं; कोण आहे मुकश चौधरी?

Chennai Super Kings' Mukesh Chaudhary हा आईच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून मैदानावर खेळताना दिसला. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली.

Chennai Super Kings' Mukesh Chaudhary

Chennai Super Kings' Mukesh Chaudhary

Chennai Super Kings’ Mukesh Chaudhary decided to play match even after death of his mother : आयपीएलच्या 19व्या सीझनमध्ये गुरुवारी दोन मोठ्या संघांमध्ये हाय व्होल्टेज असा सामना सुरू होता. हे संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स मात्र वानखेडेवर सुरू असलेल्या या सामन्यांमध्ये एक भावूक करणारा क्षण पाहायला मिळाला. तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू मुकेश चौधरी हा आपल्या आईच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून मैदानावर खेळताना दिसला. एवढेच नाही तर यावेळी त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत आपलं कर्तव्य पार पाडलं.

रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून शिवसेनेतच तू-तू, मैं-मैं; मनसेचा मात्र जाहीर पाठिंबा…

दरम्यान मुकेशच्या या दुःखामध्ये सहभागी व चेन्नई सुपर किंग्सच्या टीमच्या खेळाडूंनी मुकेशच्या आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी काळीपट्टी बांधून मैदानात उतरले होते. त्याचबरोबर याबाबत चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट लिहिण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, काही क्षण खेळापेक्षा मोठे असतात. शब्दांमध्ये व्यक्त न करता येणार दुःख मनात बाळगून तुम्ही मैदानात उतरतात. तेव्हा खऱ्या अर्थाने ते साहस असतं मुकेश आज एक क्रिकेटपटू नाही तर आपल्या आईसाठी खेळणारा मुलगा आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक बॉल आम्ही तुझ्यासोबत उभे आहोत, टीम, चाहते आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. शक्ती, प्रार्थना आणि प्रेम सदैव मुकेश…

दिल्लीची ताकद वाढणार…

आयपीएल 2026 मध्ये सहापैकी तीन सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक आनंदाची बातमी दिली आहे. आयपीएल 2026 मध्ये स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कला खेळण्याची परवानगी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर दिल्ली कॅपिटल्सची ताकद वाढणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मिचेल स्टार्क 1 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे.आयपीएल 2026 मध्ये (IPL 2026) दिल्लीने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये तीन विजय आणि तीन गमावले आहे. ते सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. त्यामुळे मिचेल स्टार्कचे (Mitchell Starc) पुनरागमन दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) मोठा दिलासा असणार आहे.

Exit mobile version