WTC Points Table : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांतील दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी असणारे समीकरणे बदलली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यांच्या शेवटच्या दिवशी सोनल दिनुशाने शानदार फलंदाजी करत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. दोन सामन्यांची मालिका भारताने 1-0 ने आपल्या नावावर केली आहे. कोलंबो कसोटी ड्रॉ झाल्याने याचा मोठा फायदा बांगलादेशला झाला आहे.
भारताला कोलंबो कसोटी (Colombo Test) ड्रॉ राहिल्यामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Points Table) मोठा फटका बसला आहे. या गुणतालिकेत भारतीय संघा आता 51.52 विजायाच्या टक्केंसह पाचव्या स्थानावर कायम आहे. जर हा सामना भारतीय संघाने जिंकला असता तर 57 विजयाच्या टक्केसह चौथ्या स्थानावर पोहचला असता पण आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारतीय संघाला उर्वरित सात कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे. श्रीलंका (INDvsSL) दौऱ्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
तर दुसरीकडे कोलंबो कसोटी ड्रॉ झाल्यानंतर बांगलादेशचा संघला मोठा फायदा झाल्याचा दिसून येत आहे. बांगलादेश या सामन्यानंतर गुणतालिकेत 55.56 टक्के विजयाच्या सरासरीसह चौथ्या स्थानावर कायम आहेत. तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. जर ते हा सामना हरले असते, तर ते सातव्या स्थानावर घसरले असते.
A victory in the first Test at Galle and a closely contested second Test ending in a draw at Colombo.
India win the Series 1–0. #SLvIND pic.twitter.com/SjCwxmZtIS
— BCCI (@BCCI) August 27, 2026
22,000 कोटी रुपयांचे कर्ज अन् 6.5 कोटी रुपयांची परतफेड ; सुभाष चंद्रा पुन्हा चर्चेत
WTC 2025-2027
Points table updated most likely after today’s test ends in a draw
India v Sri Lanka – 2nd Test Colombo – Result – DRAW
The only hope India to make it to final now has to win at least 1 test in NZ & then possibliy beat Australia in BGT at home 4-1 or 4-0 or 5-0 pic.twitter.com/fqPP8kQ4oj
— Madhur Kapoor (@MadhurKapoor12) August 27, 2026
ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम
ऑस्ट्रेलिया सध्या 80 टक्के विजयाच्या सरासरीसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाची अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता खूप प्रबळ आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर असून 75 टक्के विजयाच्या सरासरीसह त्यांनी अंतिम फेरीतील आपल्या दाव्याला बळकटी दिली आहे. या दोघांशिवाय, न्यूझीलंडचा संघ 72. 22 टक्के सरासरीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
