IND vs SL : भारतीय संघ खेळणार WTC फायनल? श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर जाणून घ्या समीकरण

IND vs SL  : श्रीलंकाविरुद्ध सुरु असणाऱ्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्या भारतीय संघाने शानदार कामगिरी करत बाजी मारली आहे.

IND Vs SL

IND vs SL  : श्रीलंकाविरुद्ध सुरु असणाऱ्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्या भारतीय संघाने शानदार कामगिरी करत बाजी मारली आहे. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघ आतादेखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत आहे.

डब्लूटीच्या टेबलमध्ये सध्या भारतीय संघाची गुण टक्केवारी (Points Percentage) 53.33 % आहे. अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना 60% चा टप्पा ओलांडणे आवश्यक आहे. डब्लूटीसीच्या (WTC) इतिहासात आतापर्यंत 60 टक्केपेक्षा जास्त असणारे दोन संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात भिडतात. डब्लूटीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघासाठी समीकरणे
भारताला आणखी 6 सामने जिंकणे आवश्यक

रविवार, 23 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मालिकेत भारत श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) दुसरा आणि अंतिम सामना खेळणार आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घातली, तर त्यांची गुण टक्केवारी 57.57% पर्यंत वाढेल. श्रीलंका दौऱ्यानंतर, भारत न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर आपल्या घरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. हे सात सामने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. श्रीलंकेविरुद्धच्या अलीकडील विजयानंतर, भारताला उर्वरित आठ सामन्यांपैकी किमान सहा ते सात सामने जिंकणे आवश्यक आहे.

सहा विजय त्यांना 60% गुण टक्केवारीच्या (PCT) टप्प्याच्या जवळ नेतील, तर सात ते आठ विजय त्यांना पहिल्या दोन क्रमांकांमध्ये स्थान मिळवून देतील. सध्या 77.78% गुणांसह ऑस्ट्रेलियन संघ अव्वल स्थानावर आहे.

आज ‘या’ 5 राशींचे नशीब बदलणार अन् होणार आर्थिक फायदा-

तर गतविजेता दक्षिण आफ्रिका संघ 75% गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 72.22% गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेश 66.67% गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

follow us