कॉमनवेल्थ चॅम्पियन्स वेटलिफ्टर संजीता चानूवर 4 वर्षांची बंदी

नवी दिल्ली : दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन (Commonwealth Games Champion)ठरलेली भारताची वेटलिफ्टर (India’s weightlifter)संजीता चानू (Sanjita Chanu)हीच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. गतवर्षी डोप चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संजीतावर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) चार वर्षांची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळादरम्यान जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीच्या (WADA) प्रतिबंधित यादीत असलेल्या अॅनाबॉलिक […]

Sanjita Chanu

Sanjita Chanu

नवी दिल्ली : दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन (Commonwealth Games Champion)ठरलेली भारताची वेटलिफ्टर (India’s weightlifter)संजीता चानू (Sanjita Chanu)हीच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. गतवर्षी डोप चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संजीतावर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) चार वर्षांची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळादरम्यान जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीच्या (WADA) प्रतिबंधित यादीत असलेल्या अॅनाबॉलिक स्टिरॉइड-ड्रोस्टऐनोलोनच्या मेटाबोलाइटसाठी संजीताची चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

मलाही खालची भाषा येते पण… उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी सुनावलं

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे (IWF) अध्यक्ष सहदेव यादव यांनी संजीतावर बंदी घातल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, होय संजीतावर नाडाने चार वर्षांसाठी बंदी घातली आहे. खरंतर हा संजीतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कास्यपदक जिंकले होते, जे काढून घेण्यात आले आहे. संजीताने 2014 मध्ये ग्लास्गो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय 2018 मध्ये तिने 53 किलोचा भार उचलून पदक जिंकले होते.

मणिपूरची खेळाडू संजीता चानूकडे बंदीच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्याय आहे. मात्र ती आवाज उठवणार का? हे अद्याप स्पष्ट नाही. संजीताने जानेवारीमध्ये एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले होते की, या आधी देखील मला याचा अनुभव आला आहे. मला माहिती नाही की, मी अपील करेन की नाही, कारण दोन्ही प्रकरणांमध्ये माझीच हार होणार आहे, असंही यावेळी संजीताने सांगितले.

Exit mobile version