Chandika Hathurusingha : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) मोठा निर्णय घेत बांगलादेश पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा (Chandika Hathurusingha) यांना निलंबित केले आहे. 2023 एकदिवसीय विश्वचषकादरम्यान खेळाडूसोबत अनुचित वर्तन केल्याबद्दल चंडिका हथुरुसिंघा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बांगलादेशला नुकतंच भारताविरुद्धच्या कसोटी आणि टी-20 मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंडिका हथुरुसिंघा यांच्या बांगलादेश क्रिकेटसोबत 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत (Champions Trophy 2025) करार होता मात्र त्यांना आता निलंबित करण्यात आले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने चंडिका हथुरुसिंघा यांच्या जागी वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू फिल सिमन्सला बांगलादेश पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केला आहे. फिल सिमन्सचा (Phil Simmons) कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत असणार आहे.
बीसीबीचे अध्यक्ष फारूख अहमद यांनी सांगितले की, हथुरसिंघे यांच्यावर गैरवर्तनाच्या दोन प्रकरण होते तसेच त्यांनी करारापेक्षा जास्त रजा घेतली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. हथुरसिंघे यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दुसऱ्यांदा मुख्य प्रशिक्षक म्हणून बांगलादेश संघात सामील होते.
प्रियांका गांधींची राजकारणात एंट्री! मतदारसंघ ठरला, उमेदवारीही जाहीर; वाचा सविस्तर
हथुरसिंघे यांच्या कार्यकाळात बांगलादेश संघाने विश्वचषक 2023 आणि त्यानंतर T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. तर गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 1-0 ने पराभव केला होता.