Download App

Virat Kohli : ज्याची भीती होती तेच झालं! विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून आऊट

Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. उर्वरित सामन्यांतही विराट कोहली खेळण्याची शक्यता कमीच होती. अखेर या चर्चा खऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे. राजकोट येथे होणाऱ्या पुढील कसोटी सामन्याआधी शुक्रवारी निवडकर्त्यांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत विराटही सहभागी झाला होता. त्याने या बैठकीत सांगितले की तो संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही. विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

Virat Kohli : विराट ठरला ‘वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला पछाडले

तिसऱ्या कसोटीसाठी विराट संघात परतेल अशी चर्चा सुरू होती. मात्र खात्रीशीर माहिती मिळत नव्हती. विराट सध्या विदेशात आहे. संघाचे कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) संघ व्यवस्थापन त्याच्या संपर्कात असून त्याच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले होते. विराटबरोबरच केएल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील संघाबाहेर आहेत. या दोघांपैकी एकजण पुढील सामन्यांसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा झाली त्यावेळी या संघात विराटचे नाव नव्हते. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून नाव मागे घेतले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट खेळेल अशी चर्चा होती. नंतर तो पुढील सामन्यांतही खेळणार नाही अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण, विराट कोहलीने स्वतःच पुढील सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले.

शतकांचा ‘विराट’ बादशाह; किंग कोहलीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला वानखेडेवरच टाकले मागे

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्याने तेही या सामन्यात नाहीत. तिसऱ्या सामन्यात विराट उपलब्ध असेल असे सांगण्यात आले होते. आता मात्र टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. राहिलेल्या तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा लवकरच होणार आहे.

follow us