Virat Kohli : विराट ठरला ‘वनडे क्रिकेटर ऑफ इयर’; आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला पछाडले

Virat Kohli : विराट ठरला ‘वनडे क्रिकेटर ऑफ इयर’; आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला पछाडले

Virat Kohli One Day Cricketer of the Year : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) वनडे क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारावर विराटने (Virat Kohli) सलग चौथ्यांदा नाव कोरलं. आयसीसीने नुकतेच वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर केला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) क्रिकेटर ऑफ इयर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलग सहाव्यांदा हा पुरस्कार मिळवला आहे. हा पुरस्कार विराट कोहलीने सलग चौथ्यांदा मिळवला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, विराटने आता त्यालाही मागे टाकले आहे.

ICC च्या कसोटी संघातून रोहित-विराटला डच्चू; ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना संधी

याआधी टी 20 क्रिकेटर ऑफ इयर पुरस्कार सूर्यकुमार यादवने पटकावला. त्यानंतर विराटने आणखी एक पुरस्कार मिळवला. या पुरस्काराच्या शर्यतीत आणखी दोन खेळाडू होते. पण या विराटने या दोन्ही खेळाडूंना मागे टाकत पुरस्कार पटकावला. याआधी विराटने 2012,2017 आणि 2018 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. आता हा पुरस्कार सर्वाधिक वेळा मिळवणारा विराट हा क्रिकेट जगतातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावावर होता.

सन 2023 मध्ये विराटने एकूण 27 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्याने 1377 धावा केल्या. या वर्षात विराट कोहलीने 6 शतके आणि 8 अर्धशतके केली. त्याच्या याच कामगिरीची दखल घेण्यात येऊन त्याला मागील वर्षाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. याआधी टी 20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार सूर्यकुमार यादवने पटकावला. यामुळे दोन मोठ्या पुरस्कारावर भारतीय खेळाडूंनी आपले नाव कोरले.

IPL 2023: शुभमन गिल गुजरात टायटन्ससाठी इतिहास रचणार? अंतिम सामन्यात विराट कोहलीचे रेकॉर्ड मोडू शकतो

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज