ICC च्या कसोटी संघातून रोहित-विराटला डच्चू; ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना संधी
ICC Men’s Test Team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे प्रमाणेच जागतिक कसोटी संघही (ICC Men’s Test Team 2023) जाहीर केला आहे. या संघात मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा (Australia) दबदबा दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) संघाची कमान देण्यात आली आहे. या संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन तर श्रीलंका, न्यूझीलंडच्या प्रत्येकी एक खेळाडूचा समावेश आहे. संघात चार फलंदाज, एक विकेटकीपर, तीन अष्टपैलू आणि तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. या संघात भारतीय खेळाडूंना फारशी संधी मिळालेली नाही. याउलट एकदिवसीय संघात मात्र 11 पैकी 6 खेळाडू भारतीयच आहेत.
IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न
या कसोटी संघात ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने, केन विल्यमसन, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड, अॅलेक्स कॅरी या खेळाडूंचा समावेश आहे. या संघात पाकिस्तान, बांग्लादेश, वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, वनडे आणि एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. परंतु, तरीही त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.