Mahendra Singh Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटविश्वात कॅप्टन कूल या नावाने ओळखला जातो. आता हे नाव त्याला कुणी दिलं हा संशोधनाचा विषय ठरावा. मात्र याच नावाला आता कायदेशीर अधिष्ठान मिळणार आहे. आता ही गोष्ट तुम्हाला कदाचित खरी वाटणार नाही. पण हेच खरं आहे. स्वतः धोनीनेच “कॅप्टन कूल” या (Captain Cool) नावासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.
ट्रेडमार्क्स रजिस्टर पोर्टलवरील माहितीनुसार अर्जाची सध्याची स्थिती स्वीकृत आहे. 16 जून रोजी अधिकृत ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. धोनीने 5 जून रोजी कॅप्टन कूल नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केला होता. प्रस्तावित ट्रेडमार्क क्रीडा प्रशिक्षण, प्रशिक्षणासाठी विविध सुविधा, प्रशिक्षण आणि अन्य सेवा देण्यासाठीच्या श्रेणीअंतर्गत नोंदणीकृत आहे.
टीम इंडियाचं बॅडलक! दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा विजय; शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकला
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्येच निवृत्ती जाहीर केली होती. आता या घटनेला पाच वर्षे उलटली आहेत. धोनीने शेवटचा सामना 2019 मधील विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. या पराभवाबरोबरच स्पर्धेतूनही बाहेर पडावं लागलं होतं. यानंतर धोनीने कोणताच सामना खेळला नाही. नंतर 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती जाहीर केली.
कॅप्टन कूल नावाने ओळखला जाणारा धोनी एक यशस्वी कर्णधार होता. त्याच्या कप्तानीत भारतीय संघाने 2007 मधील टी20 वर्ल्डकप, 2011 मधील वनडे वर्ल्डकप आणि 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. धोनी एकमात्र असा कर्णधार होता ज्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकल्या होत्या. या व्यतिरिक्त धोनीच्या नेतृत्वात भारताने 2010, 2016 मध्ये आशिया कप स्पर्धा जिंकली होती. धोनीने 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
आयपीएलमध्येही धोनीने चमकदार कामगिरी केली आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मधील आयपीएल विजेतेपद धोनीने चेन्नई संघाला मिळवून दिले होते. तसेच त्याच्या कप्तानीत चेन्नईने 2010 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग टी20 पुरस्कार जिंकला आहे. धोनीने 2016 ते 2017 मध्ये सीएसकेवर बंदी आल्यानंतर पुणे संघाकडून नशीब आजमावलं होतं.
सामना गमावला दंडही बसला, इंग्लंड टीमचं मोठं नुकसान; ‘या’ कारणामुळे ICC कडून कारवाई