Team India : सुदर्शन-अर्शदीपची एन्ट्री, नायर-ठाकूरचे पुनरागमन; सिलेक्शनमधील ५ मोठ्या गोष्टी

Team India Squad Announced For England Test Series Know Big 5 Points Of Selection : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आज (दि.२४) करण्यात आली आहे. BCCI ने या दौऱ्यासाठी १८ खेळाडूंना संघात समाविष्ट केले असून, कसोटी संघाचे (Test Cricekt) नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने अनुभवी खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंवरही विश्वास दाखवल्याचे दिसून येत असून इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत ५ मोठ्या गोष्टींवर नजर टाकूया…
वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डने रचला इतिहास, ODI मध्ये ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक
टीम इंडियाचं सिलेक्शन अन् ५ मोठ्या गोष्टी
नुकताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्माची जागा शुभमन गिलने (Shubman Gill ) घेतली आहे. शुभमन गिल कर्णधार होईल हे आधीच निश्चित मानले जात होते. त्यामुळे भारतीय कसोटीसंघाचं कर्णधारपद गिलच्या गळ्यात टाकणं हा आश्चर्यकारक निर्णय नाहीये.
सुदर्शन-अर्शदीप सिंगची एन्ट्री
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात सुदर्शन-अर्शदीप सिंगची एन्ट्री झाली आहे. सलामीवीर साई सुदर्शन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या दोन्ही खेळाडूंची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड झाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात सुदर्शन आणि अर्शदीप दोघेही उत्तम फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे या दोघांची निवड होणं संघासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
करुण-शार्दुलचे पुनरागमन
सुदर्शन-अर्शदीप सिंगच्या एन्ट्रीसोबतच बीसीसीआयने मधल्या फळीतील फलंदाज करुण नायर आणि वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर या दोघांना संधी दिली आहे. करुणने मार्च २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेरच आहे. तर, शार्दुलने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे खेळला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने सर्व विक्रम मोडले, जगभरात मिळाले 65.3 अब्ज लाईव्ह व्ह्यूज
ऋषभ पंतची उपकर्णधारपदी नियुक्ती
वरील खेळाडूंशिवाय इंग्लड दौऱ्यासाठी गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धूरा देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अलिकडेच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत बुमराहकडे संघाचे उपकर्णधारपद होते. या दैऱ्यात बुमराहने दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते.
सरफराज खानला वगळले
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान संघाचा भाग होता. मात्र, आता इंग्लंड दौऱ्यातून सरफाराजला वगळण्यात आले आहे. त्याऐवजी निवड समितीने करुण नायरला संधी दिली आहे.
शमीचे पुनरागमन रखडले
इंग्लंड दौऱ्यासाठी एकीकडे करुण नायर आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर या दोघांना संधी देत त्यांचे शमीचे पुनरागमन करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे गवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात शमीचे पुनरागमन होऊ शकते असे मानले जात होते. पण, तंदुरूस्त नसल्याचे कारण देत शमीचे संघात पुनरागमन होणे आणखी काहीकाळासाठी रखडले आहे.
बच्चे कंपनी होणार खुश! टेस्ट क्रिकेटचे सामने अगदी फ्री; कुणी घेतला हा खास निर्णय
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात कोण-कोण?
इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय संघात शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईसवरन, मोहम्मद जयस्वार, मोहम्मद जयस्वार, बृहस्पतिवार प्रसिध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
– १ ली कसोटी : २०-२४ जून २०२५ – हेडिंग्ले, लीड्स
– दुसरी कसोटी : २-६ जुलै २०२५ – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
– तिसरी कसोटी : १०-१४ जुलै २०२५ – लॉर्ड्स, लंडन
– चौथी कसोटी : २३-२७ जुलै २०२५ – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
– ५ वी कसोटी : ३१ जुलै-४ ऑगस्ट २०२५ – द ओव्हल, लंडन