Download App

पाकिस्तानला तिहेरी झटका! सामना गमावला, आयसीसीने केली मोठी कारवाई

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ओव्हर गती कमी राखल्याचे कारण देत आयसीसीने पाकिस्तानवर संघावर कारवाई केली.

Pakistan Cricket : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला तिहेरी झटका बसला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. यानंतर आयसीसीने ओव्हर गती कमी राखल्याचे कारण देत कारवाईचा बडगा उगारला आहे. संपूर्ण संघावर सामना शुल्काचे 25 टक्के दंड लावण्यात आला आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही पाच अंक कापण्यात आले आहेत असा तिहेरी फटका पाकिस्तान संघाला बसला आहे.

मेलबर्नमध्ये दारूण पराभव अन् भारत WTC मधून आऊट? जाणून घ्या नवीन समीकरण

कारवाईनंतर पाकिस्तान क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. संघाकडे 24.31 अंक आहेत. यानंतर वेस्टइंडिजचा नंबर आहे. वेस्टइंडिजचे 24.24 गुण आहेत. आयसीसीने पाकिस्तानचे पाच अंक कमी केले आहेत. परंतु, यामुळे पाकिस्तानचे फारसे नुकसान होणार नाही. कारण, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतून पाकिस्तान आधीच बाहेर झाला आहे. टूर्नामेंटमधील फायनल सामना 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) पाकिस्तानचा दहा विकेट राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकी संघाने 615 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 194 धावांवर ऑल आऊट झाला. यानंतर फॉलोऑन मिळाल्यानंतर पुन्हा मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी 478 धावा केल्या. परंतु, प्रतिस्पर्धी संघाला कोणतेही टार्गेट देऊ शकली नाही.

यानंतर दक्षिण आफ्रिकेने माफक अशा 58 धावांचा पाठलाग करून पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. अशा पद्धतीने पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan Cricket) अतिशय लाजिरवाणा पराभव झाला.

कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचे ‘हे’ 5 मोठे विक्रम, अजून कोणीच मोडू शकलेलं नाही

follow us