Download App

T20 वर्ल्डकपमधील मैदानांचं रेटिंग जारी; न्यूयॉर्कचं वादग्रस्त मैदानाचा धक्कादायक रिझल्ट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बऱ्याच कालावधीनंतर खेळपट्ट्यांचे रेटिंग जारी केले आहे.

T20 World Cup 2024 Pitches : अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत यंदाचा टी 20 वर्ल्डकप आयोजित (T20 World Cup 2024) करण्यात आला होता. अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने काही सामने अमेरिकेत खेळले गेले. या सामन्यांसाठी न्यूयॉर्क शहरात (New York) एक मोठे स्टेडियम उभारण्यात आले होते. नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियम असं या मैदानाचं नाव होतं. या स्टेडियममधील खेळपट्टीवर दिग्गज खेळाडूंनी प्रचंड टीका केली होती.

या मैदानावर एकाही सामन्यात जास्त धावा होऊ शकल्या नव्हत्या. याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना झाला होता. येथील ड्रॉप इन पिच अॅडलेडच्या क्यूरेटर डेमियन हफने तयार केले होते. कोणतीही तपासणी करण्याआधीच या खेळपट्टीवर सामने आयोजित करण्यात आले होते. या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळी घेत असल्याचे दिसून आले होते. ज्यामुळे फलंदाजांना बॅटिंग करताना अडचणी आल्या. गोलंदाजांसाठी मात्र ही खेळपट्टी चांगलीच ठरली. न्यूयॉर्कमधील आठ सामन्यांतील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 107.6 इतकी राहिली होती.

T20 World Cup 2025 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचा पहिला सामना कधी? जाणून घ्या..

खेळपट्टीला काय मिळालं रेटिंग ?

आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बऱ्याच कालावधीनंतर खेळपट्ट्यांचे रेटिंग जारी केले आहे. न्यूयॉर्कमधील सामन्यांसाठी रंजन मदुगले, डेविड बून, जेफ क्रो आणि रिची रिचर्डसन चार सामनाधिकारी (मॅच रेफ्री) होते. न्यूयॉर्कमधील मैदानांवर भारत पाकिस्तानसह खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांपैकी 6 सामन्यांना समाधानकारक रेटिंग मिळाली. भारत आणि आयर्लंडसहीत दोन सामन्यांना मात्र असमाधानकारक रेटिंग देण्यात आले. या व्यतिरिक्त श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यासाठी वापरल्या गेलेल्या खेळपट्टीला नापसंत करण्यात आले.

सुपर 8 फेरीतील भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या खेळपट्टीला चांगले रेटिंग मिळाले आहे. अंतिम सामन्यासाठी वापरल्या गेलेल्या खेळपट्टीला अतिशय चांगले रेटिंग मिळाले आहे.

T20 मध्ये अव्वल टीम इंडिया! वर्षभरात फक्त एक पराभव; प्रत्येक सामन्यात नवा ‘हिरो’

follow us