IND vs AUS 4th Test : मेलबर्न टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या (IND vs AUS Test) नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँड या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. एक प्रकारे त्यांनी भारताच्या (Team India) विजयावर ग्रहणच लावलं. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 228 धावा झाल्या होत्या. या दोन्ही फलंदाजांनी (India vs Australia) शेवटच्या विकेटसाठी 55 धावांची भागादारी केली.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जसप्रित बुमराहने 4 आणि सिराजने 3 विकेट घेत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मोडून काढली. पण ल्योन आणि बोलँड या दोघांच्या नाबाद 55 धावांच्या भागीदारीने सिराज आणि बुमराहच्या (Jasprit Bumrah) मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरवले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील फलंदाजी दरम्यान भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. बुमराहने सातव्या ओव्हरमध्ये सॅम कॉन्स्टसला बाद करून टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. या डावात सॅमला काही करता आलं नाही. फक्त 8 रन करून तो बाद झाला.
सुनील गावस्करांना पाहताच नीतीशचे वडील भावूक, थेट पायांवर टेकवलं डोकं; व्हिडिओ पाहाच
टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 358 धावा केल्या होत्या. सिराज आणि नितीश कु्मार रेड्डी मैदानावर होते. चौथ्या दिवशी भारताला फक्त 11 धावा करता आल्या. टीमची शेवटची विकेट नितीशच्या रुपात पडली. नितीशने 180 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 114 धावा केल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात एकूण 369 धावा केल्या.
दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. 173 धावांवरच 9 विकेट पडल्या होत्या. आता कांगारू टीम 200 रन देखील करणार नाही असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र कठीण परिस्थितीत कसं खेळायचं याची शिकवण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आधीपासूनच आहे. येथेही तेच घडलं. शेवटच्या विकेटसाठी नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँडने चिवट फलंदाजी केली. दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 228 धावा केल्या होत्या. यांसह ऑस्ट्रेलियाने भारतावर 333 धावांची आघाडी घेतली आहे. आता उद्या सामन्याचा पाचवा आणि अखेरचा दिवस आहे.
मुलाचं शतक अन् वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; अथक संघर्षाचं झालं चीज