मुलाचं शतक अन् वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; अथक संघर्षाचं झालं चीज

मुलाचं शतक अन् वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; अथक संघर्षाचं झालं चीज

Nitish Kumar Reddy : नीतीश कुमार रेड्डी पुन्हा एकदा टीम इंडियासाठी (Nitish Kumar Reddy) संकटमोचक ठरला. नीतीशने मेलबर्न कसोटी सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावले आणि या सामन्यात भारतीय संघाचं दमदार (Team India) कमबॅक करवून दिलं. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये नीतीशने शतक ठोकताच क्रिकेट चाहत्यांचा आनंदाला पारावार राहिला नाही. पण, याच गर्दीत असाही एक व्यक्ती होता जो मात्र आनंदाश्रू गाळत होता. हा व्यक्ती दुसरा कुणी नाही तर नीतीशचे वडील मुत्याला रेड्डी आहेत.

मेलबर्न क्रिकेट मैदानात नीतीशने शतक (IND vs AUS) पूर्ण करताच स्टेडियममधील 80 हजार प्रेक्षक जागेवर उठून उभे राहिले. हे दृश्य पाहून त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली. हा प्रसंग असा होता की त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. हा क्षण असा होता की यात त्यांच्या संघर्षाचं चीज झाल्याचं फळ होतं.

मेलबर्न कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाज मात्र ढेपाळले होते. संघाची स्थिती बिकट झाली होती. अशा परिस्थितीतून संघाला बाहेर काढून मजबूत स्थितीत घेऊन येण्याची गरज होती. एकवेळी तर 191 धावांत सहा बाद अशी स्थिती झाली होती. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी भारतीय संघ संघर्ष करत होता. पण, याच संकटाच्या काळात नीतीशने स्वतःला सिद्ध केलं.

Video : विराटचा धक्का अन् ऑस्ट्रेलियाचा सॅम भडकला; मैदानात नेमकं काय घडलं?

खरंतर या सामन्यात त्याच्या निवडीवर प्रश्न विचारले जात होते. अनेत क्रिकेट तज्ज्ञांनी त्याच्या या निवडीवर प्रश्न विचारले होते. पण संकटाच्या काळातच माणसाची खरी परीक्षा असते. मग हा प्रसंग कोणताही असो. नीतीशने अशाच कठीण प्रसंगात मैदानावर तग धरून शानदार शतक झळकावले. संघाला सावरलेच शिवाय आपल्या टीकाकारांनाही चोख उत्तर दिले. वडिलांना या काळात जी टीका सहन करावी लागली. त्या सगळ्यांचीच बोलती बंद करण्याचं काम नीतीशने केलं.

नोकरी सोडली म्हणून टोमण्यांचा पाऊस

नीतीश कुमार रेड्डीचे वडील मुत्याला रेड्डी हिंदुस्तान झिंकमध्ये नोकरी करत होते. विशेष म्हणजे सरकारी नोकरीत होते. पण त्यांच्या विशाखापट्टणम शहरात काम बंद पडलं आणि त्यांची बदली उदयपूरला झाली. या काळात मुलाच्या क्रिकेट ट्रेनिंगवर परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी 25 वर्षांची सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्याने निवृत्तीतून मिळणाऱ्या पैशांवरच ते अवलंबून होते.

त्यामुळे त्यांना पैशांची अडचण भासू लागली. या संकटाच्या काळात त्यांना नातेवाईकांची मदत तर झाली नाहीच नुसते टोमणेच ऐकावे लागले. जो तो त्यांना नावे ठेवत होता. सरकारी नोकरी सोडल्याचं त्यांना इतकं वाटलं नाही जितकं दुःख त्यांना या टोमण्यातून झालं. पण अशाही परिस्थितीत नीतीशच्या आईने देखील भक्कम पाठिंबा दिला. आई वडिलांचा पाठिंबा मिळाल्यानंतर नीतीश निर्धास्त झाला. त्याने बाकीच्या गोष्टींचा विचार सोडून फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. या अथक संघर्षानंतर त्याला आज या संघर्षाचं फळ मिळालं.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सामना कधी आणि कोणासोबत होणार…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube