Champions Trophy 2025 : पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार (Champions Trophy 2025) आहे. या स्पर्धांसाठी आता फार दिवस राहिलेले नाहीत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत. हायब्रीड मॉडेल पद्धतीने सामने होणार आहेत. भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळणार नाही त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाचे (Team India) सर्व सामने दुबईत होणार आहेत. तर बाकीचे सामने पाकिस्तानाती लाहोर, कराची आणि रावळपिंडी या शहरांत होणार आहेत. परंतु, स्पर्धा जवळ आलेल्या असताना आयसीसीचं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानात तिन्ही मैदानांचं काम अजून सुरू आहे. तीन स्टेडियम तयार झालेले नाहीत.
आता पाकिस्तानने यासाठी (Pakistan Cricket Board) मुदत वाढवून पुढील तारीख दिली आहे. याआधी ही तारीख 31 डिसेंबर 2024 अशी होती. आता मात्र नव्या तारखेनुसार 26 जानेवारीपर्यंत स्टेडियम तयार होतील असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला (ICC) कळवलं आहे.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमची क्षमता 35 हजार प्रेक्षकांची आहे. संपूर्ण स्टेडियममध्ये नवीन खुर्च्या बसवल्या आहेत. 480 एलईडी लाइट्स लावले आहेत. पुढील आठवड्यात डिजिटल रिप्ले स्क्रिन्स लावण्यात येतील. पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार हे स्टेडियम जानेवारी महिन्यातील अखेरच्या आठवड्यापर्यंत तयार होईल असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Champions Trophy : भारताने नकार देताच पाकिस्तानचा नवा फॉर्म्यूला; BCCI मंजूर करणार?
स्टेडियम तयार करण्याची जबाबदारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आहे. त्यांच्याकडून सर्व कामं होणे अपेक्षित आहे. एखाद्या वेळी आवश्यकता वाटल्यास आयसीसीचे व्यवस्थापक लक्ष देतील. यासाठी आयसीसीचा सपोर्ट पिरियड 12 जानेवरीपासून सुरू होणार आहे. जर स्टेडियम वेळेत तयार झालं नाही तर दुसरा पर्यायही तयार आहे. परंतु, यावर आताच काही सांगता येणार नाही अशी स्थिती आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण 8 संघांत 15 सामने होणार आहेत. यासाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. याच गटात न्यूझीलंड आणि बांग्लादेशही आहे. दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड संघ आहेत. सर्व आठ संघ आपापल्या गटात तीन-तीन सामने खेळतील. यानंतर दोन्ही गटातील आघाडीवरील दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. पहिला सेमी फायनल सामना दुबईत तर दुसरा सेमी फायनल सामना लाहोरमध्ये होईल. अंतिम सामना यानंतर होईल. जर एखादा संघ फायनल पोहोचला तर तो टूर्नामेंटमध्ये एकूण 5 सामने खेळेल.
Asian Champions Trophy 2024: चीनचा धुव्वा उडविला; भारत पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन