ICC Rankings मध्ये फेरबदल, भारतीय स्टार ऋषभ पंतचा मोठा धमाका तर बुमराहने इतिहास रचला
ICC Rankings : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) शानदार कामगिरी करणारे भारतीय स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत (ICC Rankings) मोठा फायदा झाला आहे.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत ऋषभ पंत पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटच्या टॉप-10 फलंदाजांमध्ये आला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरीमुळे ऋषभ पंत टॉप-10 मधून बाहेर पडला होता मात्र बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत त्याने पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. तर गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहे. जसप्रीत बुमराह 908 रेटिंग गुणांसह अव्वल गोलंदाज आहे.
तर दुसरीकडे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला (Temba Bavuma) देखील मोठा फायदा झाला आहे. त्याने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टेंबा बावुमा 769 रेटिंगसह 6व्या क्रमांकावर पोहोचला आहे. याच बरोबर ताज्या आयसीसी क्रमवारीत टॉप-5 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. आता देखील इंग्लंडचा जो रूट पहिल्या क्रमांकावर आहे तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक 876 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर 867 रेटिंगसह न्यूझीलंडचा केन विल्यमसन आहे. तर भारताचा यशस्वी जैस्वाल 847 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड 772 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.
Sizzling performances in the #AUSvIND and #SAvPAK series finales lead to big rewards in the latest ICC Men’s Test Player Rankings 📈#WTC25https://t.co/MAQnGNgFaE
— ICC (@ICC) January 8, 2025
बाळासाहेब थोरातांसह पवारांच्या ‘या’ शिलेदाराने ईव्हीएम पडताळणी अर्ज घेतला मागे
तर दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेंबा बावुमा 769 रेटिंगसह 6व्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी तो 9व्या स्थानावर होता. तर श्रीलंकेचा कामेंदू मेंडिस 759 च्या रेटिंगसह 7 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ऋषभ पंत 9व्या क्रमांकावर आहे.