रिंकू सिंगला संघात दाखल होण्यासाठी BCCI चं बोलावणं, सर्फराज, ऋषभ पंतपैकी एकाची जागा घेणार
India vs Bangladesh : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातली पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. जवळपास २० महिन्यानंतर ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. जसप्रीत बुमराह हाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर प्रथमच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. (India vs Bangladesh) या कसोटी मालिकेसाठी सराव व्हावा यासाठी भारताचे अनेक सीनियर्स खेळाडू Duleep Trophy 2024 च्या पहिल्या फेरीत खेळले.
IND VS BAN : मोठी बातमी! बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, या स्टार गोलंदाजाला संधी
रिंकू सिंगला निरोप
ऋषभने भारत ब संघाकडून खेळताना दुसऱ्या डावात खणखणीत अर्धशतक झळकावलं होतं. यशस्वी जैस्वालही याच संघाकडून खेळला होता. परंतु, त्याला फार काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशात दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत निवड समितीकडून दुर्लक्षित राहिलेल्या रिंकू सिंगला बोलावणं धाडलं गेलं आहे. रिंकू सिंग दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत India B संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
२० अर्धशतकांचा समावेश
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघात ऋषभ, यशस्वी, सर्फराज खान यांची निवड झाल्यानं India B संघात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे रिंकूला बोलावले गेले आहे. दुलीप ट्रॉफीची दुसरी फेरी १२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्यात रिंकूला आपली छाप पाडण्याची मोठी संधी आहे. रिंकूने उत्तर प्रदेश ट्वेंटी-२० लीगमध्ये मिरट माव्हेरिक्सचे नेतृत्व करताना दमदार खेळ केला आहे. त्याने ४७ प्रथम श्रेणी सामन्यांत ५४.७०च्या सरासरीने ३१७३ धावा केल्या आहेत. त्यात ७ शतकं व २० अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १६३ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.
खूप आनंद होतोय
अभिमन्यू इश्वरच्या नेतृत्वाखाली भारत ब संघाने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत शुभमन गिलच्या भारत अ संघाचा ७६ धावांनी पराभव केला आहे. रिंकू म्हणाला की, मेहनत करणं माझ्या हाती आहे आणि दुलीप ट्रॉफीसाठी बोलावणं आल्याने मी आनंदी आहे. जेव्हा सुरुवातीला हा संघ जाहीर झाला, तेव्हा त्यात माझे नाव नव्हते. त्याचं मला थोडं दुःख वाटलं होतं. पण, आज मला खूप आनंद होतोय, की मी भारत ब संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Babar Azam : PCB देणार बाबर आझमला पुन्हा धक्का, पाकिस्तान क्रिकेटमध्ये लवकरच होणार मोठा निर्णय!
ब संघाकडून खेळणार
उत्तर प्रदेशातील चार खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहेत. ध्रुव जुरेल व यश दयाल यांची कसोटी मालिकेसाठी निवड झाल्याने ते दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत दिसणार नाहीत. रिंकू आणि आकिब खान हे उत्तर प्रदेशचे खेळाडू दिसतील. क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अंकित चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितुनसार रिंकू व आकिब हे दोघंही दुलीप ट्रॉफीत भारत ब संघाकडून खेळणार आहेत.