Virat Kohli : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने नुकतेच (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोळा वर्षे पूर्ण केली. 2008 मध्ये श्रीलंकेवरुद्धच्या सामन्यातून विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये (Team India) पदार्पण केलं होतं. या सामन्यात विराटला विशेष काही करता आलं नव्हतं. फक्त 12 धावा काढून तो बाद झाला होता. पण आज सोळा वर्षांच्या काळात विराटने अनेक विक्रम केले आहेत. जगभरात आघाडीचा फलंदाज म्हणून तो ओळखला जात आहे.
रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटने असे अनेक रेकॉर्ड केले आहेत ज्यांना तोडणे कठीण काम ठरणार आहे. या काळात त्याला अनेक अडचणींचाही सामना करावा लागला. ज्यावेळी तो आऊट ऑफ फॉर्म होता त्यावेळी तर त्याला जास्त संकटांचा सामना करावा लागला. विराटला आता संघाबाहेर बसवावे असे सल्लेही माजी क्रिकेटर्स देऊ लागले होते. पण त्याने मेहनतीने यावर मात करत क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांची नोंद केली.
Virat Kohli : सामना जिंकताच विराटचा थेट अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. सन 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप, 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2024 मधील टी 20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात विराट होता. विराटने 2011 मध्ये टी 20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण आता त्याने या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताने टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराटने टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. विराटने आतापर्यंत 113 कसोटी, 295 वनडे आणि 125 टी 20 सामने खेळले आहेत.
सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) सर्वाधिक शतके करणारा फलंदाज विराट कोहली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यात 49 शतके केली आहेत तर विराटने सचिनला मागे टाकत शतकांचे अर्धशतक केले आहे. विराटच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ (Indian Cricket) सलग सहा वर्षे पहिल्या क्रमांकावर राहिला होता.
सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत किंग कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच आहे.
कोहलीने भारतीय संघाचा कर्णधार असताना सात द्विशतक लगावले आहेत. हा विक्रम करत त्याने श्रीलंकेचा माजी (Sri Lanka) फलंदाज माहेला जयवर्धने आणि वेली हेमंड यांची बरोबरी केली आहे.
तब्बल 500 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारा चौथा भारतीय खेळाडू आणि नववा जागतिक खेळाडू विराट कोहली आहे. यांसारखे अनेक विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याच्या या रेकॉर्डची बरोबरी किंवा रेकॉर्ड तोडण्याची कामगिरी नजीकच्या काळात एखादा खेळाडू करील याची शक्यता वाटत नाही.