Download App

पहिल्याच सामन्यात विंडीजचा धुव्वा! इंग्लंडच्या विजयात ‘विराट’चा हात; सामन्याच्या ‘हिरो’चा मोठा खुलासा

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 400 धावांचा डोंगर उभा केला.

Cricket News : बर्मिंघममध्ये इंग्लंड संघाने जोरदार कामगिरी करत वेस्टइंडिजचा पराभव केला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने वेस्टइंडिजचा 238 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू जेकब बॅथलने शानदार कामगिरी केली. त्याने 53 चेंडूत 82 धावांची खेळी करत इंग्लंडच्या विजयात मोठा वाटा उचलला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 400 धावांचा डोंगर उभा केला.

इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेले वेस्टइंडिजचे फलंदाज सुरुवातीपासूनच दडपणात होते. त्यांचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. अख्खा संघ फक्त 26.2 ओव्हर्समध्ये 162 धावांवर ऑलआउट झाला. वेस्टइंडिजकडून कर्णधार शाई होप याने सर्वाधिक 25 धावा केल्या.  या विजयासह इंग्लंडने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

शाब्बास टीम इंडिया! भारताच्या लेकींचा पराक्रम, वेस्टइंडिजचा ६० धावांनी पराभव

जेकब बॅथल आयपीएलमध्ये बंगळुरू संघाकडून खेळला आहे. त्यामुळे या सामन्यातील विजयाचं श्रेय त्याने बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिलं. आयपीएल सुरू होण्याआधी मी ज्या पद्धतीचा खेळाडू होतो आता त्यापेक्षा चांगला झालो आहे. विराटने त्याचे क्रिकेटमधील अनुभव माझ्याशी शेअर केले. तसेच मला फलंदाजीत भरपूर मदतही केली असे जेकब सामन्यानंतर म्हणाला.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत जेकब फक्त दोन सामने खेळू शकला. या दोन्ही सामन्यांत त्याने 67 धावा केल्या होत्या. यानंतर जेकब पु्न्हा इंग्लंडला परतला. त्याच्याजागी आरसीबीत टीम सीफर्टला घेण्यात आले. जेकबने स्काय स्पोर्ट्सला सांगितले की माझा आयपीएलमधील अनुभव चांगला राहिला. विराटबरोबर फलंदाजी करण्याचा अनुभव वेगळाच होता. विराटकडून मला बरच काही शिकायला मिळालं असेही जेकबने सांगितले.

फक्त अडीच दिवसांत मॅच संपली! कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा धुव्वा; इंग्लंडचा दणदणीत विजय

follow us