Download App

दक्षिण आफ्रिकेची दाणादाण! टीम इंडियाचा सामन्यासह मालिका विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला.

IND vs RSA Match Report : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजया बरोबरच भारताने 3-1 अशा फरकाने मालिकाही (Team India) जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघातील फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. त्यामुळे वीस ओव्हर्समध्ये 283 धावांचे लक्ष्य आफ्रिकेला दिले होते. प्रत्युत्तरात आफ्रिकेला (South Africa) फक्त 148 धावाच करता आल्या.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब राहिली. रेजा हेनरिक्सला भोपळाही फोडता आला नाही. अर्शदीप सिंहने (Arshadeep Singh) हेनरिक्सला बाद केले. तर रेयॉन रिकलटन फक्त एक रन करून बाद झाला. त्याला हार्दिक पांड्याने तंबूत (Hardik Pandya) धाडले. कर्णधार एडन मार्करमही अपयशी ठरला. फक्त 8 धावा करून बाद झाला. क्लासेन आणि हेनरिक्स दोघेही शून्यावर बाद झाले.

India vs South Africa 4th T20I : संजू सॅमसन अन् तिलक वर्माची रेकॉर्डब्रेक इनिंग, आफ्रिकेला 284 धावांचे लक्ष्य

अवघ्या दहा धावात आफ्रिकेचे चार फलंदाज बाद झाले होते. यानंतर डेविड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी चांगली भागीदारी केली. पाचव्या विकेटसाठी दोघांनी 54 चेंडूत 86 धावा जोडल्या. मिलरने 27 चेंडूत 36 धावा केल्या. तर स्टब्सने 29 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने दोन-दोन विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या, रमनदीप सिंह आणि रवी बिश्नोई यांन प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वीस ओव्हर्समध्ये 283 धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी शतक केले. या मालिकेत दोघांनी दुसऱ्यांदा शतकाचा आकडा पार केला. तिलक वर्माने 47 चेंडूत 120 धावा करून बाद झाला. त्याने 9 चौकार आणि 10 षटकार खेचले. तर संजू सॅमसन 109 धावा करून नाबाद राहिला. त्याने 6 चौकार आणि 9 षटकारांची आतषबाजी केली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. विदेशात T20 सामन्यात भारताने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताने या सामन्यात तब्बल 283 धावा केल्या. तर एका वर्षात 3 शतके करणारा संजू सॅमसन पहिला खेळाडू ठरला आहे.

टीम इंडियाला धक्का! चिवट फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला

follow us