Download App

‘…अशी खिल्ली उडवणं लज्जास्पद’, व्यंकटेश प्रसाद यांनी दिला रोहित शर्माला खुला पाठिंबा

Venkatesh Prasad Supports Rohit Sharma : भारतीय क्रिकेट (Cricket) संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी वादग्रस्त टिप्पणी केलीय. त्यानंतर सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी रोहितला पाठिंबा दिलाय. शमा मोहम्मद यांनी रोहितच्या वजनावर भाष्य केले होते. त्याला आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार त्यांनी म्हटलं होतं. यावर प्रसादने रोहितच्या कामगिरीचा उल्लेख करत म्हटलंय की, त्याची खिल्ली उडवणं लज्जास्पद आहे.

थांबू नका…’लवकरच मुले जन्माला घाला’; तामिळनाडूच्या मु्ख्यमंत्र्यांचं फर्मान, बैठकच बोलावली

व्यंकटेश प्रसाद काय म्हणाले?

माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी रोहित शर्माला उघडपणे पाठिंबा दिलाय. रोहितच्या कामगिरीबद्दल बोलताना ते म्हणाला की, त्याची थट्टा करणे अत्यंत लज्जास्पद आहे. प्रसाद यांनी शमा मोहम्मद यांच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलंय की, रोहितने कर्णधार म्हणून खूप प्रतिष्ठा राखली आहे. 8 महिन्यांपूर्वी त्याने आपल्याला टी-20 विश्वचषक जिंकून दिला. त्याला बॉडी शेम करणे हे अत्यंत दयनीय आणि अन्याय आहे. इतक्या वर्षांपासून आपल्या कौशल्याने आणि नेतृत्वाने काहीतरी साध्य केलेल्या व्यक्तीबद्दल थोडा आदर असला पाहिजे.

महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण पहिल्याच दिवशी स्थगित; मोठं कारण समोर…

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

शमा मोहम्मद यांनी दावा केलाय की, रोहित शर्मा हा आतापर्यंतचा सर्वात वाईट भारतीय कर्णधार आहे. रोहितने 2024 मध्ये भारताला दुसरा टी 20 विश्वचषक जिंकून दिला. तो स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 8 सामन्यात 257 धावा केल्या. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते.

रोहितने एकदिवसीय सामन्यात 48.74 च्या सरासरीने 11064 धावा केल्या आहेत. यामध्ये 32 शतके आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे. अलिकडेच, तो 261 डावांमध्ये 11,000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज बनला. त्याने एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतकेही झळकावली आहेत, जो एक जागतिक विक्रम आहे. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच सर्वाधिक शतके करणारा खेळाडू देखील आहे. कपिल देव आणि धोनीनंतर विश्वचषक जिंकणारी तो तिसरा भारतीय कर्णधार आहे.

 

follow us