महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण पहिल्याच दिवशी स्थगित; मोठं कारण समोर…

महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण पहिल्याच दिवशी स्थगित; मोठं कारण समोर…

Mahadev Munde Wife Dnyaneshwari Munde Hunger Strike Ends : बीडमधून (Beed) एक मोठी बातमी समोर येतेय. परळीतील महादेव हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. परंतु ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांचं उपोषण तूर्तास स्थगित केल्याचं समोर येतंय.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ सीआयडी आणि एसआयटीकडे द्यावा. हत्येच्या कटामध्ये ज्यांनी फोन केलेत, त्या सगळ्या आरोपींचे सीडीआर काढावे. तसेच मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक (Beed News) करावी, अशा प्रमुख तीन मागण्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केल्या होत्या. त्यांच्या उपोषणाला मस्साजोगच्या ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिल्याचं समोर आलं होतं.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शांत; विरोधी पक्षनेता कोण होणार? यावरून संभ्रम

आता अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी मुंडे कुटुंबियांना आरोपींना करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपले आमरण उपोषण तूर्तास स्थगित केल्याचं समोर आलंय. त्यांनी पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाला आता तब्बल 16 महिने उलटून गेले आहेत, तरीही आरोपी मोकाटच फिरत आहेत. पोलिसांनी अजून एकाही आरोपीला अटक केललेली नाही. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोप केला जातोय.

संतोष दानवे-पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांत तू तू- मैं मैं, कार्यकर्त्यांकडून मारहाण; डॉक्टरांच्या आई-वडिलांच्या आरोप..

याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक करावी. तसेच त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मुंडे कुटुंबीयाने मागणी केलीय. याच मागणीसाठी मुंडे कुटुंबीय आजपासून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलं होतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube