संतोष दानवे-पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांत तू तू- मैं मैं, कार्यकर्त्यांकडून मारहाण; डॉक्टरांच्या आई-वडिलांच्या आरोप..

संतोष दानवे-पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांत तू तू- मैं मैं, कार्यकर्त्यांकडून मारहाण; डॉक्टरांच्या आई-वडिलांच्या आरोप..

Santosh Danve Audio clip : भाजप आमदार संतोष दानव (Santosh Danve) यांनी भोकरदन येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ही धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हयार झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉ. योगेश आक्स (Dr. Yogesh Aakse) यांना वैधकीय दवाखान्यात जाऊन मारहाण केल्याचा आरोप डॉ. योगेश आक्से यांच्या आईवडिलांनी केला.

आत्महत्या करावी वाटतेय; स्वारगेट प्रकरणातील पीडितेच्या फोनने वसंत मोरेंना अश्रू अनावर 

डॉ. योगेश आक्से यांच्या आई-वडिलांना याबाबत पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली. दोषी कार्यकर्त्यांवर भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई केल्या गेली नसल्याचा दावा आक्से यांच्या आई-वडिलांनी केली. तसेच आमच्या मुलाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा. माझा मुलगा दलित असल्याने अट्रोसिटी अॅक्टनुसार मारेकऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी योगेश आक्से यांच्या आईवडिलांनी पोलिस अधीक्षकांकडे केली.

दरम्यान, आक्से यांच्या आईवडिलांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची देखील भेट घेऊन कारवाईची मागणी केलीय.

मढी यात्रा, राणेंचं प्रक्षोभक भाषण, मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्ताक्षेप करावे नाहीतर…, प्रताप ढाकणे आक्रमक 

योगेश आक्से यांचे वडील शिवलाल आक्से यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, माझा मुलगा पशु वैद्यकीय अधिकारी आहे. तो पीचडी होल्डर आहे. मागासवर्गीय समाजतून आम्ही येतो. मात्र, जातीयवादी लोकप्रतिनिधींनी माझ्या मुलाला मारहाण केली.
संतोष दानवे हे भोकरदनाचे आमदार आहे. त्यांना कुणीतरी माझ्या मुलाविषयी खोटी माहिती दिली. त्यानंतर दानवेंनी फोनवरून शिवीगाळ केली. आणि नंतर दानवेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आम्हाला न्याय द्या, असं ते म्हणाले.

मारहाण होत असेल तर नोकरी कशी करावी?
तर माझ्या मुलाला दानवेंच्या कार्यकर्त्यांना मारहाणा केली. ड्युटीवरील कर्मचाऱ्याला अशी मारहाण करणं, शिवीगाळ करणं हे योग्य आहे का? मला न्याय पाहिजे. रात्री-अपराात्री जनावरांवर उपचार करण्यासाठी माझ्या मुलाला कुठंही जावं लागतं. अशी मारहाण होत असेल तर नोकरी कशी करावी? असा सवाल आक्से यांच्या आईंनी केली. तसेच आमदाराने शिविगाळ केली. धमकी दिली. तुझी लायकी आहे का, तू मुर्ख आहे, तु ड्युटी कशी करतो, अशी धमकी दिली. त्यांतर पाच मिनिटांच माणसं आली आणि त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बेहोश होईपर्यंत मारलं, असा दावा आक्से यांच्या आईंनी केला.

ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
डॉ. योगेश आक्से यांच्याविषयी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार संतोष दानवे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. पशुधन गोठ्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांसाठी आक्से गरीब शेतकऱ्यांकडून ५०० ते २००० रुपये घेतात. ते बऱ्याचदा दवाखान्यात नसतात, अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या. त्यानंतर दानवेंनी डॉ. योगेश आक्से यांना कॉल करून नांजाच्या शेतकऱ्यांचं काय झालं? ते सह्या घ्यायला आले होते. त्यावर मी त्यांना उद्या यायला सांगितलं, असं आक्से म्हणाले.

तर शेतकऱ्यांशी जरा नीट बोलत जा, लोकांना ग्रॅण्टली घेऊ नका, येडे चाळे करू नका… मला शिकवू नका, जरा नीट राहा, असं म्हणत दानवेंनी खडसावं. त्यावर आक्से यांनी मी काय म्हणालो? मी कोणाशी बोललो? असा उटल सवाल दानवेंनी केला.

तू मस्तीला येऊ नको. तुझ्या विषयी एक तक्रार नाही, अनेक तक्रारी आहेत… तू गरीब अन् सामान्यांशी नीट बोलत जा…तू नीट बोलत नाही.. फायलींसाठी, सह्यांसाठी पैसे घेतो, खाजगी प्रॅक्टिस करतो, अरे तूझी एक तक्रार नाही. अनेक तक्रारी आहेत, असं दानवे दानवे म्हणाले. त्यावर आक्से यांनी प्रूफ दाखवा म्हणत प्रत्युत्तर दिले. मी खाजगी प्रॅक्टीस करत नाही. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात नीट बोला, असं आक्से यांनी म्हटलं.

अरे मुर्खा, तूला चांगले लोक अंगावर घालून बदली करील… तू मला भाषा शिकवू नको,तू ज्या भाषेत बोलतोय, त्याच भाषेत मी तुझ्याशी बोलतोय… मुर्खा तू शेतकऱ्यांचा नोकर आहेत, तू मालक नाही… तू घरी राहतो, अन् लोकांना वेठीस धरतो, असं दानवे या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये म्हणत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube